Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरशिर्डी

शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवाला सकाळी पोथी व साई प्रतिमा मिरवणुकीने मोठ्या उत्साहात सुरुवात!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथील
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवास आज शनिवारी 5 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आज शनिवारी उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन तर प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.

यावेळी संस्थानच्‍या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी व्दितीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले यांनी तृतीय अध्याय,

प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे/ सिनारे यांनी चौथा अध्याय व प्रशासकिय अधिकारी विश्‍वनाथ बजाज यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.
उत्सवाचे निमित्ताने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात आदी उपस्थित होते.

सकाळी १०.०० ते १२.०० वा. पं. कृष्‍णेंद वाडीकर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी यांचा राम रंगी रंगले हा कार्यक्रम तर दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दु. ०१.०० ते ०३.०० वा. अॅड. साई आशीष, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम होवून सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन कार्यक्रम झाला. सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती होवून रात्रौ ०७.०० ते ०९.३० यावेळेत स्‍वरश्री प्रतिष्‍ठाण, मुंबई ( दिव्‍यांग कलाकार ) यांचा आनंद यात्री हा कार्यक्रम व रात्रौ ०९.१५ वा. श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल.

श्रींची शेजारती रात्रौ १०.३० वा. (पालखी मिरवणूक परत आल्‍यानंतर) होईल. यादिवशी अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईभक्त श्री. वेंकटे सुब्रमण्‍यन, रियाद, सौदी अरबिया यांच्‍या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट, व्‍दारकामाई मंडळ व मुंबई येथील साईभक्‍त कपील चढ्ढा यांचेवतीने करणेत आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व ४ नंबर प्रवेशव्‍दाराचे आतील बाजुस करणेत आलेल्‍या श्री गजमुख गणपतीचा भव्‍य काल्‍पनिक देखाव्‍याने साईभक्‍तांचे लक्ष वेधुन घेतले.

दरवर्षीप्रमाणे मुंबई येथून आलेल्‍या श्री साई सेवक व इतर पालखी पदयात्री भाविकांनी उत्‍सवात हजेरी लावली.
उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी,रविवार दिनांक ०६ एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. कावडी मिरवणूक, श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन. सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीरामजन्‍म कीर्तन कार्यक्रम तर दुपारी १२.३० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होणार आहे.

दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री. अलोक मिश्रा, साईआस फाऊंडेशन, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत श्री. विजय गुजर, मुंबई याचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०४.०० वा. निशाणाची मिरवणूक तर सायं. ०५.०० वा. श्रींचे रथाची गावातुन मिरवणूक होणार आहे. सायं. ०६.३० वा. श्रींची धुपारती(श्रींचे रथाची मिरवणूक परत आल्‍यानंतर) होईल. तसेच सायं. ०७.०० ते १०.०० यावेळेत श्री. मनहरजी उधास, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार असून या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील.

त्‍यामुळे या दिवशी नित्‍याची शेजारती व दिनांक ०७ एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. या दिवशी श्रींचे समोर रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम होईल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button