
शिर्डी प्रतिनिधी/ आहील्यानगर जिल्ह्यातील श्रेत्रफळ फार मोठे असताना पोलीस मनुष्यबळ फारच तोकडे असतांनाही कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे दोन सोमनाथ गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी पराकाष्ठा करतांना दिसत असताना गुन्हेगारी रोखण्यात काही प्रमाणात जरी यश येत असली तरी ही जमेची बाजू असली तरी सुद्धा तरुणाईला नशेचे साहित्य पुरवणाऱ्या लोकांना

व त्यांच्या नेटवर्कला उध्वस्त करण्याचे मोठे आव्हान अहिल्या नगर पोलीस प्रशासनासमोर असल्याचे काही घटनेतून पुढे आले आहे गेल्या काही वर्षाचा शिर्डीसह लगतच्या परिसराचा बारकाईने गुन्हेगारीचा अभ्यास केला तर खुणाच्या घटनेतील आरोपी हे कमी वयाचे असल्याची बाब पुढे आली आहे त्याबरोबरच त्या घटनेतील मयत देखील तीस वयोगटाच्या आतील असल्याचे दिसून येते पालकांचे होणारे दुर्लक्ष
डोक्यात असलेली भाईगिरीची हवा विविध उपनगरात निर्माण झालेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या त्यांना मिळणारा राजाश्रय हे या मागील प्रमुख कारण असले तरी कमी कष्टात सहजपणे मिळणारा बक्कळ पैसा सायंकाळी हॉटेलमध्ये धाब्यावर. रात्री उशिरापर्यंत रेंगाळणारी तरुणाई अशा हॉटेल व धाब्यावर पोलिसांची न होणारी कारवाई रात्री न होणारी नाकेबंदी विना नंबरच्या दुचाकी याकडे देखील आता पोलीस प्रशासनाला लक्ष देत कठोरपणे कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे
जर कायद्याचा धाक निर्माण झाला नाही तर तरुणांचे होणारे हे खून रोखणार तरी कसे अशा घटना मध्ये तरुणाईला सहजपणे येणारा राग ही खुणाचे कारण ठरत असले तरी व्यसनधीनता हे देखील महत्त्वाचे कारण ठरू पाहत आहे विभक्त कुटुंबशैलीत धकाधकीच्या जीवनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना पालकांचे होणारे दुर्लक्ष देखील या समाज व्यवस्थेसाठी चिंताजनक बाब ठरू पाहत आहे असे असले तरी आपला मुलगा कोणाबरोबर फिरत आहे कोणाच्या सहवासात आहे या गोष्टीकडे देखील पालकांनी गंभीरपणे बघण्याची गरज आता महत्त्वाची ठरु पहात आहे
कमी असणारे पोलीस मनुष्यबळ. हे देखील यामागे महत्त्वाचे कारण ठरत असली तरी कमी मनुष्यबळात देखील पोलीस प्रशासनाला आपला धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे जोपर्यंत अशा घटनेची गांभीर्य आपल्या जवळपासचा माणूस जात नाही तोपर्यंत लक्षात येत नाही पण ज्या घरातला तरुण अशा घटनेत मृत्युमुखी पडतात ते कुटुंब उघड्यावर आलेले असते त्याबरोबरच ज्या घटनेत ज्या कुटुंबातील आरोपी असतात त्यांना देखील अनेक संकटांना सामोरे जावे लागते
अशावेळी संपूर्ण कुटुंब देखील विस्कळीत होतो अनेक समस्यांना सामोरे जात असताना कुटुंब देखील उध्वस्त ठरते मात्र वेळ निघून गेलेली असती अशावेळी हे सर्व रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या बरोबरच सामूहिक ताकद देखील महत्त्वाची ठरते अशावेळी लोकप्रतिनिधींनी देखील अशा घटनांना आळा घालण्यासाठी निश्चितचपणे पुढाकार घेतला पाहिजे
तरच गुन्हेगारीला आळा बसू शकतो मात्र तसे होताना दिसत नाही त्याची परिणीती अशा गुन्ह्यांन मध्ये होताना दिसत आहे शिर्डी असो की राहता कोपरगाव संगमनेर अकोले श्रीरामपूर या भागात मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध दारूची विक्री कुत्ता गोळी बंटा इंजेक्शन आदीसह विविध नश्याचे साहित्य सहजपणे विकणारी मंडळी यांच्या अगोदर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली तर काही प्रमाणात का होईना अशा घटनांना आळा घालता येईल
त्याचे परिणाम देखील चांगले दिसून येतील पण त्यासाठी पोलीस प्रशासनाची इच्छाशक्ती महत्त्वाची ठरणार आहे त्याबरोबरच असे नशेचे साहित्य विकणाऱ्यांची माहिती जागरूक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे पोलिसांनी देखील माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली तर खात्रीशीरपणे तरुणाईचे होणारे हे खून सहजपणे थांबू शकतात असा विश्वास आजही सामान्य माणसाला आहे
मात्र त्यासाठी हवी पोलिसांची इच्छाशक्ती व त्यासाठी हवी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ व राजकीय मंडळीची साथ मिळाली तर हे सहजपणे थांबू शकते मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची मोठी गरज आहे इतकेच म्हणता येईल