शिर्डीत मोबाईल शॉपी फोडणारा चोरटा जेरबंद गुन्हे शाखेचे तत्पर पथक तपासात सक्रिय लाखोंचा मुद्देमाल जप्त

शिर्डीतील दिपक रावसाहेब गोंदकर (रा. दत्तनगर, शिर्डी) यांचे साई समर्थ टेलिकॉम या मोबाईल शॉपीचे शटर अज्ञात चोरट्याने २३ सप्टेंबर २०२५ रोजी उचकटले. दुकानातील तब्बल ₹१,६२,००० किमतीचे मोबाईल चोरून नेण्यात आले. याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ९०४/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
२. गुन्हे शाखेचे तत्पर पथक तपासात सक्रिय
चोरीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी पाहणी केली. पथकात पोउपनि. संदीप मुरकुटे, पो.अं. राहुल द्वारके, विजय पवार, सुनील मालणकर, रमिझराजा आतार, भगवान धुळे यांचा समावेश होता.
गुन्हेगारांची कार्यपद्धती व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने शोधमोहीम सुरू केली.
संशयितावर पोलिसांची कारवाई
गुप्त माहितीच्या आधारे शिर्डी-सिन्नर मार्गावर, समृद्धी महामार्गाच्या कडेला एक इसम मोबाईल असलेले बॉक्स घेऊन फिरताना आढळून आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्याची खात्री केली. त्यावेळी सदर इसमाचे नाव मनोज यशवंत भोये (वय २०, रा. घोडांबे, ता. सुरगाणा) असे समोर आले. त्याच्या पिशवीतून तपास केल्यावर शिर्डीतील मोबाईल शॉपी फोडून चोरलेले मोबाईल सापडले.
४. लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात
झडतीत आरोपीकडून ₹१,०३,००० किमतीचे विविध कंपन्यांचे ९ मोबाईल व एक डेमो मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीस मुद्देमालासह शिर्डी पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेऊन सादर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. या कारवाईमुळे शिर्डीतील गुन्हेगारांना पोलिसांनी धडा शिकवला असून व्यापारी वर्गातून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.


