
“मंडळप्रमुख” शिर्डीतील पद नसलेले एकमेव मंडळ .
“डॉ हेडगेवार नगर मित्र मंडळ व महिला नवरात्र महोत्सव मंडळ” शिर्डी च्या मध्यवर्ती भागात असलेले “डॉ हेडगेवार नगर” या नावाने ओळखले जाते.

आजवर ३० वर्षे पूर्ण होऊन ३१ व्या वर्षात या मंडळाचे देवी नवरात्र महिला महोत्सव साजरा करत आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष व पदाधिकारी कुणीही नाही परंतु हे पुरुष मंडळ गणेश उत्सव असो वा देवी नवरात्र असो यासाठी सर्व महिला पुरुष एकत्रित येतात. विश्वासाने वर्गणी निधी गोळा करून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात.
स्टेज, मंडप, लाईट्स डेकोरेशन,वाद्य, हा बिग बजेट चा भाग परंतु यासाठी अनेक जन पुढे येतात. अनेक वर्षांपासून देवी मुर्ती एक कुटुंबाकडून देण्यात येते,मंडप, लाईट्स हे सुद्धा काही देणगीदार वैयक्तिकरित्या देतात.
यावर्षी देवी मुर्ती सौ.शिल्पा प्रविण मानकरी यांच्या कडून दिली तर मंडप लाईट्स डेकोरेशन चा खर्च निधी सौ.सुवर्णा गणेश गुरव यांच्या कडून देण्यात आला आहे.
स्पीकर साऊंड सिस्टीम माईक मागील वर्षी खरेदी करण्यात आली आहे. असे सांगितले.
काल देवी ची स्थापना सौ.शिल्पा श्री प्रवीण मानकर आणि पहिली आरती सौ. सोनाली व श्री अक्षय मुळे या दोन्ही यजमानाच्या हस्ते करण्यात आली.
आणि पुढील आयोजन रोज आरती साठी कोण यजमान असतील देवी ची पुजा आरती मांगलिक कार्य सेवा आपल्या हातून होण्याचा मान व शुभ आशिर्वाद आपणास मिळेल यांसाठी नावे पुकारले जातील असे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये हेडगेवार नगर मधील चारही गल्ली तील रहिवासी महिला पुरुष कुटुंबासह ठिक आठ वाजता आरती साठी उपस्थित राहाण्यास नवरात्र महिला महोत्सव मंडळाच्या वतीने मागील पंधरवड्यात झालेल्या बैठकीत सांगण्यात आले आहे.
अतिमहत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी पावित्र्य पाळण्याचे आवाहन महिलांकडून करण्यात आले आहे. त्या साठी देवी नवरात्र महोत्सव साजरा करत असताना सर्व तरूण व पुरुष मंडळाने याची काळजी घेयची आहे. आपला देवी नवरात्र उत्सव आनंदीत व एकोप्याने साजरा करतानाच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन कसे केले जाईल हे ही आवश्यक आहे.
तरी नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने एकत्र येऊन आपली उपस्थिती दर्शवावी.
डॉ हेडगेवार नगर मित्र मंडळ नवरात्र महिला महोत्सव मंडळ शिर्डी.