
शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरातील उद्योजक व साई संगम सेवाभावी संस्थेचे संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहाता तालुका अध्यक्ष संदीप भीमाशंकर सोनवणे यांच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय आदी क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल नुकताच नाशिक येथे शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देश्य संस्था नाशिक यांच्या वतीने त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र पातळीवर दिला जाणारा संस्थेचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार नाशिक

येथील कार्यक्रमात उद्योजक संदीप भीमाशंकर सोनवणे यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे अर्जुन पुरस्काराच्या मानकरी कविता राऊत वीर पत्नी हर्षदा खैरनार रिच फिल्ड फर्टीलायझर कंपनीचे चेअरमन स्वप्निल बच्छाव डॉक्टर सारिका पाटील आदींसह विविध मान्यवर व मोठा जनसमुदाय उपस्थित होता
यावेळी बोलताना संदीप सोनवणे म्हणाले की राजकीय सामाजिक जीवनात काम करताना कधीही आपण प्रसिद्धी पद पुरस्काराची अपेक्षा केली नाही मात्र या संस्थेने माझ्या कामाची दखल घेऊन राज्य पातळीवर दिला जाणारा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करून केलेल्या कामाचा सन्मान केल्यामुळे
या पुढील काळात आणखी मोठी जबाबदारी आली असून या पुढील काळात देखील आपले काम अविरतपणे साईबाबांच्या पवित्र भूमी असलेल्या शिर्डी येथून सुरूच राहील असे स्पष्ट करताना त्यांनी संस्थेच्या सर्व आयोजकांचे आभार मानले
अर्जुन पुरस्काराच्या मानकरी कविता राऊत म्हणाल्या की आज समाजात गोरगरीब सर्वसामान्य माणसासाठी काम करणाऱ्या माणसांचा अभाव दिसून येतो अशावेळी आजही समाजात उद्योजक संदीप सोनवणे सारखी माणसं समाजासाठी अविरतपणे वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून काम करताना बघितल्यानंतर मनाला मोठे समाधान वाटत असल्याचे सांगून
आज त्यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करताना मनाला मोठे समाधान वाटत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात आपले मत व्यक्त केले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सोनवणे यांच्या कार्याचा सन्मान केला शिर्डीत सोनवणे परिवार
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देत आहे संदीप सोनवणे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे