Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

दहशत करण्यासाठी गुन्हेगारांची मोडस दोन तरुणांच्या खुनासाठी ठरली होती कारण

शिर्डी प्रतिनिधी/
शिर्डी शहरातील गुन्हेगारी रोखली पाहिजे यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला मात्र नाही पाकीटमारी थांबली ना नाहि गुन्हेगरि नाही दोन निष्पाप मुलांचा जीव वाचला नाही
आज त्या घटनेला जवळपास 13 वर्षे पूर्ण होत असताना आजही त्या घटनेने शिर्डी ग्रामस्थ भयभीत झाल्याशिवाय राहत नाही

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी शहरातील पाप्या शेख नामक टोळीने अंतर्गत वादातून दहशत निर्माण करण्यासाठी शिर्डी शहरातील कालिका नगर येथील पत्रकार सुदेश बाबूलाल पाटणी यांचा मुलगा रचित व साईबाबा संस्थान कर्मचारी विलास गोंदकर यांचा मुलगा प्रवीण गोदकर या दोघांचा अत्यंत नियोजनबद्धरीत्या शिर्डी शहरातून उचलून निमगाव कोऱ्हाळे येथील काटवनात १४ जूनच्या मध्यरात्री अत्यंत निर्घृण पद्धतीने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आला या घटनेनंतर नाशिक येथील मोक्का न्यायालयाने या टोळीतील प्रमुखासह इतरांनाहीआजन्म कारावासाठी शिक्षाही दिली

मात्र निष्पाप शिर्डी शहरातील अठरा-एकोणीस वयातील हे तरुण मुले या गुन्हेगारीचे बळी ठरले यात शंका नाही ज्या कुटुंबातील ह्या दोन तरुणांचा बळी गेला ते कुटुंब अजूनही या घटनेतून सावरलेले नाही हे देखील लक्षात घेतली पाहिजे तरुण मुलांचा बळी गेल्यानंतर गोंदकर व पाटणी कुटुंब जवळपास उध्वस्त झाले न्यायालयाने न्याय दिला मात्र आपल्या घरातील गेलेली दोन तरुण मुले परत कधी येतील का हा प्रश्न या कुटुंबातील मुलांच्या आई-वडिलांना नेहमी सातावत असतो ज्या मुलांच्या खांद्यावर शेवटचा वैकुंठाचा प्रवास करायचा त्याच दोन तरुण मुलांच्या मृतदेहाला अग्नी डाग देण्याची वेळ या दुर्दैवी पित्यांवर आली

अनेक वेळा शहरातील गुन्हेगारी रोखा पाकीटमारी बंद करा यासाठी दैनिक साई दर्शन च्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र गुन्हेगारी रोखण्यात यश आले नाही त्यामुळेच की काय गुन्हेगारांच्या वाढलेल्या धाडसामुळे या निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला हे सत्य कधीच शिर्डीकरांना नाकारता येणार नाही या टोळीने आपली दहशत निर्माण करण्यासाठी ज्या निर्गुण पद्धतीने या तरुणांचा जीव घेतला ज्या पद्धतीने ह्या तरुणांचे मृतदेह शिर्डी शहरात मध्यवस्तीत आणून टाकण्याची केलेले धाडस यातून शहरावर दहशत निर्माण करण्याचा हेतू लपून राहिला नाही हे देखील शिर्डीकरांच्या लक्षात आली घटनेनंतर अनेक तीव्र स्वरूपात मोठे आंदोलने झाले

दिवस महिने व वर्ष निघून गेले बोलता बोलता या घटनेला १३ वर्ष निघून गेले आहे १५ जून चा दिवस शिडीकरांना कायमस्वरूपी या दोन तरुणांच्या खुणामुळे लक्षात राहिलेला आहे या टोळीतील लहान मोठ्या गुन्ह्यांकडे पोलिसांनी त्यावेळी केलेले दुर्लक्ष तात्कालीन पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी दिलेले पाठबळ व पाकिटमारी कडे केलेले दुर्लक्ष व यामुळे या गुन्हेगारांचे वाढलेले धाडस याची परिमिती या दोन तरुणांच्या खुणात झाली हे देखील लक्षात घेतले पाहिजे या घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी केलेला प्रयत्न ही जमिनीची बाजू असली तरी अजूनही लहान-मोठे गुन्हे करणारे गुन्हेगार या शिर्डी शहरात दिसून येतात

भविष्यात पुन्हा असा प्रसंग कुठल्या कुटुंबावर उधभवणार नाही यासाठी या घटनेतून शिर्डी पोलिसांनी बोध घेऊन गुन्हेगारांच्या नांग्या वेळीच ठेचण्याची गरज आहे त्याला ग्रामस्थांचे देखील पाठबळ फार महत्त्वाचे ठरणार आहे जर वेळीच पोलिसांनी अशा गुन्हेगारांना गजाआड करून कारवाई केली तर गोदकर व पाटणी सारख्या तरुणांचा बळी जाणार नाही हेच ह्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे हीच आमची दैनिक साई दर्शन च्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे या दोन निष्पाप जीवांना दैनिक साई दर्शन च्या माध्यमातून आमची भावपूर्ण आदरांजली

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button