Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
राजकीयशिर्डी

साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिवारांकडून प्रत्येकी १ लाखांची देणगी

शिर्डी | प्रतिनिधी :
“देवा, तुझ्या चरणी अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट आमची नसून तुझीच देणगी आहे…” या भावनेतून श्री साईबाबांच्या पावन शिर्डीत सुरू असलेल्या श्री साईचरित्र पारायण सोहळा २०२६ निमित्त कोते आणि गोंदकर परिवाराने आपल्या श्रद्धेची अनमोल ओंजळ साईचरणी अर्पण केली.
सालाबादप्रमाणे यंदाही श्री. कमलाकर भाऊ कोते यांच्या परिवाराकडून १ लाख रुपये आणि श्री. राहुल भाऊ गोंदकर यांच्या परिवाराकडून १ लाख रुपये, अशी एकूण २ लाख रुपयांची देणगी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ही देणगी म्हणजे केवळ दोन लाख रुपयांचा धनादेश नव्हे, तर साईबाबांच्या चरणी व्यक्त झालेली श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाची भावना आहे. आपल्या कमाईतील एक हिस्सा साईसेवेसाठी अर्पण करून या परिवारांनी “साईची सेवा म्हणजेच मानवसेवा” हा संदेश कृतीतून दिला आहे.
सौ. आशाताई कमलाकर कोते आणि सौ. उषाताई दिगंबर गोंदकर यांनी देणगीचे धनादेश श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब तसेच सौ. वंदना गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केले.
श्री साईचरित्र पारायणाच्या पवित्र वातावरणात साईनामाचा जयघोष, साईचरित्राचे श्रवण आणि भक्तांच्या मनात दाटून आलेली श्रद्धा अशा भक्तिमय वातावरणात ही सेवा अर्पण करण्यात आली. साईबाबांच्या चरणी अर्पण केलेली छोटीशी सेवा देखील मनापासून केली तर तीच भक्तीची खरी श्रीमंती असते, आणि कोते व गोंदकर परिवाराने आपल्या सेवेतून हेच अधोरेखित केले आहे.


साईबाबांनी जगाला “श्रद्धा आणि सबुरी”चा मंत्र दिला. त्याच श्रद्धेने आणि सबुरीने अनेक वर्षांपासून कोते व गोंदकर परिवार साईसेवेची ही परंपरा जपत आहेत. त्यामुळे त्यांच्या या योगदानाकडे केवळ देणगी म्हणून नव्हे, तर पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या साईभक्तीच्या संस्कारांची सुंदर परंपरा म्हणून पाहिले जात आहे.
“साईच्या चरणी अर्पण केलेली सेवा कधीच वाया जात नाही; ती अनेकांच्या जीवनात आनंद, समाधान आणि भक्तीचा प्रकाश निर्माण करते.”
कोते आणि गोंदकर परिवाराच्या या भक्तीमय सेवेला साईबाबांचा आशीर्वाद लाभो आणि त्यांच्या परिवारात सुख, समाधान, आरोग्य व समृद्धी नांदो, अशी भावपूर्ण प्रार्थना साईभक्तांकडून व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button