
लोणी –
साई निर्माण ग्रुप संचलित ‘साई सुहास टॉवर्स’ या भव्य गृहप्रकल्पाचे भूमिपूजन व चावी वितरण सोहळा, तसेच साईबाबा मंदिराचे भूमिपूजन, दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्या, बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री साईबाबांच्या मंदिर परिसरात पार पडणार आहे.
हा समारंभ मा. खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील (चेअरमन – पद्मभूषण डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि.) यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. यावेळी ७० शॉप्स व १८ फ्लॅट धारकांना चाव्यांचे वितरण करण्यात येईल तसेच नवीन बुकिंगचा शुभारंभही या दिवशी होणार आहे.
कार्यक्रमास ह.भ.प. उध्दवजी महाराज मंडलिक (नेवासेकर), अध्यक्ष वरदविनायक सेवाधाम, लोणी, तसेच लोणी परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
या प्रकल्पामध्ये आधुनिक सोयी, आकर्षक लोकेशन आणि उच्च दर्जाचे बांधकाम या वैशिष्ट्यांसह उच्च राहणीमानाची नवी ओळख साई निर्माण ग्रुप देत आहे.
“आपल्या घराची आणि व्यवसायाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हा प्रकल्प आदर्श ठरणार आहे,” असे साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष श्री. विजय तुळशिराम कोते पा. यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शिवाजी रायमान पा. घोगरे, श्री. कारभारी रामराव पा. घोगरे, श्री. निशिकांत रावसाहेब पा. घोगरे, श्री. वादासाहेब चंदमान पा. घोगरे, श्री. सोपान कारभारी पा. गोरे (चेअरमन, वाकडी विकास सोसायटी) आदी मान्यवर सहभागी असतील.
प्रमुख उपस्थितीत मा. आ. श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, श्री. ताराचंद तुळशीराम पा. कोते (अध्यक्ष, साईनिमांग इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज), माजी मंत्री व संचालक अ.नगर जिल्हा बँक, श्री. रविकाका बोरावके (डायरेक्टर, ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लि., भारत सरकार), श्री. अजितशेठ कुंकूळोज, श्री. संजय शिंगवी (चेअरमन, व्यापारी पतसंस्था, कोल्हार), श्री. ज्ञानदेव सोन्याबापू घोगरे, कैलासबापू कोते पाटील (प्रथम नगराध्यक्ष, किडीं) यांचा समावेश होईल.
या सोहळ्यामुळे लोणी परिसरात नवी गृहनिर्माण दिशा निर्माण होणार असून, साई निर्माण ग्रुपचे हे आणखी एक यशस्वी पाऊल ठरेल. “सुंदर लोकेशन, उच्च राहणीमान आणि सुरक्षित गुंतवणूक — साई सुहास टॉवर्स तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करणार आहे.” 🌼
