Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
अ.नगरशिर्डी

नेत्रदानाची चळवळ आणखी जोमाने व्‍हावी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर

संपुर्ण जगभरात १० जुन जागतीक नेत्रदान दिन म्‍हणुन साजरा केला जातो जागतिक नेत्रदान दिवसाचे औचित्‍य साधुन श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ रुग्‍णालयात दि.१० जुन २०२५ रोजी सकाळी ११ वा. विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करणेत येवुन जागतीक नेत्रदान दिन साजरा करणेत आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी,गोरक्ष गाडीलकर ,भा.प्र.से हे होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने श्री साईनाथ नेत्रपेढीमध्‍ये नेत्रदान केलेल्‍या आठ नेत्रदात्‍यांच्‍या परिवारांचा सन्‍मान सोहळा तसेच याचबरोबर नेत्ररोपन झालेल्‍या ११ रुग्‍णांचाही यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या हस्‍ते सन्‍मान करण्‍यात आला यावेळी बोलताना गाडीलकर यांनी नेत्रदानाची चळवळ ही आणखी जोमाने पुढे नेवुन ही चळवळ घराघरात पोहचवावी असे आवाहन केले.

नेत्रदात्‍यांच्‍या परिवाराच्‍या सत्‍कारावेळी मल्‍हारवाडी येथील नेत्रदाते कु. साहिल प्रशांत दोशी वय वर्ष-१२व कु दिव्‍या प्रशांत दोशी वय वर्ष-१५ या नेत्रदात्‍याच्‍या परिवारांचा आजी, आजोबा, वडील, बहीण मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे हस्‍ते सत्‍कार होताना परिवारा बरोबरच संपुर्ण सभागृह भावुक झाले.

नेत्रदानासारखे पवित्र कामामध्‍ये दु:खामध्‍ये या परिवाराने दाखविलेल्‍या धाडसाबद्दल श्री गाडीलकर यांनी त्‍यांचे आभार व्‍यवक्‍त करुन त्‍यांच्‍या कार्याबाबत श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने कृतज्ञता व्‍यक्‍त केली.याचबरोबर नेत्ररोपन झालेल्‍या रुग्‍णांनाही आपल्‍या भावना व्‍यक्‍त करुन श्री साईनाथ नेत्रपेढी सुरु केल्‍याबद्दल श्री साईबाबा संस्‍थानचे आभार व्‍यक्‍त केले .डॉ.अशोक गावित्रे यांनी नेत्रदानाचे महत्‍व, नेत्रदाना विषयीची माहिती यावेळी उपस्‍थीतांना दिली.


यावेळी वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, डॉ.अजित पाटील, डॉ.सौदामिनी निघुते, डॉ.अनघा विखे, सौ.मंदा थोरात , श्रीमती नजमा सय्यद यांचे सह. हॉस्पिटल व कर्मचारी व अधिकारी नेत्रदात्‍यांचे परिवार व नेत्ररोपन झालेल्‍या रुग्‍ण व रुग्‍णांचा परिवार यांची उपस्‍थीती होती.


कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक वैद्यकीय अधिक्षीका, डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुग्‍णालयाचे जनसंपर्क अधिकारी, श्री. सुरेश टोलमारे यांनी केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button