
शिर्डी प्रतिनिधी
दिनांक २७/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे राहूरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढ़त असतांना किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,
गुटखा बनविण्यासाठी लागणारी लाल रंगाची सुपारी, तंबाखू असे अवैधरित्या सिया कर्नाटक तेथुन गुजरात राज्यामध्ये गुटखा बनविण्यासाठी शासनाचा कर चुकवून बनावट बिले तयार करून नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार कोट्यावधिची तंबाकू सुपारी 13 वाहने व वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे
ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये लाल सुपारी व तंबाखु असल्याचे दिसुन आले. चालकांकडे त्यांचे ताब्यातील सुपारी व तंबाखु बाबत विचारपुस करता त्यांनी सदरची सुपारी व तंबाखु ही मोहंमद अक्रम रा. कर्नाटक याची असून त्यांचे सांगणेप्रमाणे सदरची सुपारी ही गुजरात राज्यामध्ये गुटखा बनविण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. त्यांचेकडे सुपारी व तंबाकुच्या परवान्याबाबत विचारपुस करता त्यांचेकडे कोणतेही बिले मिळून आली नसुन
बिल्टीची पाहणी करता सदरची बिल्टी ही संगणीकृत नसून हस्तलिखीत बनावट तयार करण्यात आल्याचे व माल पोचविण्याचा पत्ता नमूद केलेला आहे. त्यामुळे वरील ट्रक चालकांकडे मिळून आलेली लाल सुपारी व तंबाखु ही कर चुकवुन व बनावट बिले तयार करून आणली असल्याची प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने ६.१७,८५०००/० रुपये किमतीची २,०५,९५० किलो लाल सुपारी, १५,६०,००० रुपये किमतीची ७८०० किलो तंबाखू व २,१०,००,०००/- रुपये किमतीचे १३ वाहने असा एकूण
८,४३,४५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन मिळून आलेली सुपारी तंबाखु बाबत खात्री करुन कारवाई करणे बाबत राज्य कर सह आयुक्त, वस्तु आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून पुढील कारवाई वस्तु आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांचे मार्फतीने करण्यात येत आहे.
सदरची कारवाई श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,लक्ष्मण खोकले, भिमरान खमें, रिचर्ड गायक राहुल डोके सतिष भवर, सुनिन मालकर, महादेव भांड उमाकांत गावडे यांचे पथक तयार करून सदरची कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आलेले होते