Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
अ.नगरराजकीय

मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे कॅमेरे सुरळीतपणे सुरु

अहमदनगर – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आली असून त्याबाबत कोणतीही कमतरता राहिलेली नाही. या ठिकाणी नेमण्यात आलेली त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

        ३७ - अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या एक्‍स या सोशल मिडिया अकाऊन्टवरून प्रसारित झालेल्या सुरक्षा कक्षाच्या  सीसीटीव्ही व्हिडीओबाबत वस्तुस्थिती मांडताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी माहिती दिली की, एक्स या सोशल मिडिया अकाऊन्टवर प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही निवडणूक प्रशासनाकडून विहित नियमानुसार नेमण्यात आलेली सीसीटीव्ही पुरवठादार आहे. या पुरवठादाराशी झालेल्या करारनाम्यानुसार सीसीटीव्ही व आनुषंगिक उपकरणे वेळोवेळी तपासून त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी पुरवठादाराची आहे. लोकसभा मतदारसंघांच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षाकक्षाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही तसेच सुरक्षा व्यवस्थेची दैनंदिन देखरेख करण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांच्या दि. ६ मे २०२४ व १७ मे २०२४ च्या आदेशानुसार जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.









        या आदेशानुसार दि. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांची नेमणूक करण्यात आली होती.  दि. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ७:५४ वाजता श्री. शेळके यांना ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी हॉलच्या एका कॅमेऱ्याचे लूज कनेक्शन असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार त्यांनी सायंकाळी ८:१५ वाजता सदर पुरवठादार अजिनाथ शिवाजी मुळे, स्वामी एन्टरप्रायझेस यांना सीसीटीव्ही व आनुषंगिक उपकरणांची तपासणी करण्याकरिता कळविले होते. त्यानुसार सदर पुरवठादार यांनी तिथे उपस्थित असलेल्या सीआरपीएफ सुरक्षारक्षकांना याबाबत पूर्वकल्पना दिली होती. तसेच सीआरपीएफ सुरक्षारक्षकांच्या नोंदवहीमध्ये प्रवेश करण्याबाबत सायंकाळी ८:२० वाजता नोंद केली होती. तद्नंतर दोन सीआरपीएफ सुरक्षारक्षकांसोबत वरील सीसीटीव्ही पुरवठादार यांनी मतमोजणी हॉलच्या कॅमेऱ्याची तपासणी केली होती. त्यानंतर सायंकाळी ८:२५ वाजता तिथून निघताना पुन्हा  सीआरपीएफ सुरक्षारक्षकांच्या नोंदवहीमध्ये नोंद केली होती. 













        ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे कोणतेही कॅमेरे नादुरुस्त नसून ते सुरळीतपणे काम करीत असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button