Letest News
राजकीय हस्तक्षेपामुळे झाली शिर्डी पोलिस यंत्रणा हतबल ?  अशा कारणांनेच वाढते आहे शिर्डीत गुन्हेगारांच... शिर्डीत दडिहंडीच्या दिवशी लागला गालबोट तिघांनी एकावर चाकूने वार करून संपवले  सिनेअभिनेत्री कंगना राणावत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्या महिलेचा खून तिच्याच पतीने केले पोलीसांनी चक्रे फिरवून पतिला घेतले ताब्यात श्री साईबाबांबद्दल चुकीच्या अफ़वा व आर्थिक फसवणूकी सह विविध विषयांवर धोरण व यंत्रणा राबवावी श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे...
अ.नगरक्राईम

पकडलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून गेला ! मात्र कर्तबगार पोलिसांनी त्यास काही क्षणातच पुन्हा जेरबंद केला !!

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर पोलिसांनी एका गुन्ह्यात एका आरोपीस अटक करुन शहर पोलिस स्टेशनमध्ये आणले असता पोलिसांच्या हाताला झटका मारुन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांवर मोठ्या नामुष्कीचे संकट ओढावले गेले होते,दिनांक 24/02/2025 रोजी नशेच्या गोळया व औषध विक्री करण्याकरीता खंडाळा श्रीरामूपर येथे आलेला आरोपी नामे जावेद सिराज शेख,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

वय 28 वर्षे, रा. आडगाव रोड, बैलबाजार समोर, लोणी खुर्द ता. राहता जि. अहिल्यानगर यास पकडुन त्यांच्याकडुन नशेचे टरर्मोन इंजेक्शनच्या 10 भरलेल्या बॉटल व 02 खाली बॉटलसह एकुण 83,830/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता व त्याच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 154/2025 एन.एस.2023 चे कलम 123, 210,278,125 सह कलम जिवानावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3,7, सह कलम औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 (ब). 18 (क), शिक्षा कलम 27 (ब) (ii) सह वाचन औषध नियंत्रन किंमत आदेश 2013 चे परिच्छेद 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयात नमुद आरोपीतास अटक करण्यात आली होती.
तपासी अधिकारी सदर आरोपीताकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करीत असतांना त्यांच्या हाताला झटका देवुन तो श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथुन पळुन गेला होता. तरी सदर आरोपीतास बेलापूर ता. श्रीरामपूर येथुन पोलीस पथकाने ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

तसेच वरील नमुद गुन्हयात पळुन गेलेबाबत त्यांच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 164/2025 बी.एन.एस. कलम 132,121 (1), 262, 127(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाइ अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन सर्व अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.मात्र गुन्हेगारांना वठणीवर आणण्याकामी श्रीरामपूर पोलिस पुर्वीपासून चे मोठे तरबेज असल्याने पळून गेलेल्या या आरोपीच्या आगदी काही क्षणातच पुन्हा मुसक्या आवळल्याने पोलिसांविषयी नागरीकांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज दुर झाला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button