
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी वरून मुंबई जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केलेले असतानाही खाजगी प्रवासी बस आली नाही .त्याचा ट्रॅव्हल्स ऑफिसवर जाब विचारला असता व पैसे परत मागितले असता प्रवाशालाच उलट शिवीगाळ केल्या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक तसेच बस चालक यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील हॉटेल व्यवसायिक विमल मखनलाल पटेल यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,
दि. 05/05/2025 रोजी मी रात्री 10/30 वाजता चे. सुमारास मी माझ्या मनी हॉटेल सावळीविहीर ता. राहाता येथे असतांना मला मुंबई येथे
जाण्यासाठी मी माझ्या मोबाईल नंबर 9223278913. वरुन https://m.paytm.me/paytmhote/wa या वेबसाईड वरुन डाल्फीन ट्रॅव्हल्स हाऊस या बसचे ऑनलाईन तिकीट नं. PNR 211720325. टिकीट नं.23lotou हे तिकीट दर रुपये 1200 असे ऑनलाईन पाठवुन एक तिकीट बुक केले होते. सदरची ट्रॅव्हल्स ही दि. 06/05/2025 रोजी शिर्डी साई प्लाझा हॉटेल पहाटे 4/45 वा. येथे येणार होती. व मला तेथे थांबायला सांगितले होते.
त्यानंतर मी साई ट्रॅव्हल्स शिर्डी येथील अजमोदीन फत्तेमोमहनद सय्यद यांना त्याचा मोबाईल नं. 9422733309 या नंबरवर फोन करुन डाल्फीन बस क्र. MH 03 EG 9423 या बसवरील चालक गुलफाम याचा मोबाईल नंबर 7054163227 हा दिला होता. तेव्हा मी सदर डाल्फीन ट्रव्हल्सवरील चालकास रात्री 11/00 वा. चे. सुमारास फोम करुन सांगितले होते की,
माझे आपले ट्रॅव्हल्समध्ये मुंबई येथे जाण्यासाठी मी https://m.paytm.me/paytmhote/wa या वेबसाईटवरून तिकीट बुक केले असुन माझे बसमधील सीट नंबर 5(M) हे आहे. तेव्हा बसवरील चालक हा मला म्हणाला की मी दि. 06/05/2025 बस ही सकाळी 04/45 वा.चे. सुमारास शिर्डी येथे साई प्लाझा हॉटेल येथे येणार आहे.
तेव्हा तुम्ही तेथे थांबा असे सांगितले होते त्यानंतर मी सदर बसवरील चालकास 04/30 वा. फोन करुन सांगितले की, मी साई प्लाझा हॉटेल शिर्डी येथे थांबलो आहे. तेव्हा बसवरील चालक मला म्हणाला की, मी १०
मिनीटात तेथे येतो. असे म्हणाला ,परंतु बस तेथे आलीच नाही.
तेव्हा मी बसवरील चालक यास परत फोन लावुन बस कुठे आहे याबाबत विचारणा केली असता मी येतो, असे त्यांने फोनवर वारंवार सांगितले. त्यानंतर सकाळचे 05/00 वाजले होते तेव्हा मी परत त्यास फोन करुन सांगितले की, तुम्ही मला शिर्डी साई प्लाझा हॉटेल येथे थांबायला सांगितले होते. परंतु तुम्ही बस घेवुन आले नाही
तेव्हा सदर बसवरल चालक हा मला म्हणाला की मी आता बस घेवुन नाशिक येथे आहे. असे बोलुन त्याने फोन कट केला त्यानंतर मी वारंवार फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. व मला परत फोन पण केला नाही. तेव्हा मी शिर्डी येथील अजमोदीन फतेमोमहनद सय्यद यांना फोन करुन म्हणालो की,
बस तर शिर्डी येथे आलीच नाही तरी मी माझे ऑनलाईन बुक केलेले तिकीटाचे पैसे द्या असे म्हणालो असता अजमोदीन सय्यद याने मला शिवीगाळ केली आहे. माझी साई यात्री ट्रॅव्हल्स कडून तिकीट बुकींगबाबत फसवणुक झाली आहे. म्हणून १) डाल्फीन ट्राव्हल्स हाऊस मालक सर्फराज सिद्धीकी व २) मोसम भाई व ३) ड्रायव्हर गुलफार्म व ४) शिर्डी येथील ट्रॅव्हल्स एजंट अजमोदीन फतेमोमहनद सय्यद रा. शिर्डी ता. राहाता यांचविरुद्ध त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 491 /2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शिर्डी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे साईभक्त व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. कारण अनेकदा शिर्डीत असे प्रकार होतात.
खाजगी प्रवासी बस ह्या सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर येत नाही. बस थांबाही बदलतात. त्यामुळे साईभक्त प्रवाशांना मोठी अडचण निर्माण होते. यावर परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे साईभक्त प्रवासी बोलत आहेत.