
सावळीविहीर प्रतिनिधी
सावळीविहीर येथील एका नामांकित शाळेच्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने त्या शिक्षकावर एट्रोसिटी सह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी स्पोर्ट शिक्षकास अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आलेले आहे त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
सावळीविहीर येथील एका नामांकित शाळेत हा शिक्षक कामाला आहे त्याने एका मुलीला सांगितले कि तुझा क्रिकेटचा फॉर्म भरला आहे तुला प्रॅक्टिस करायला यावे लागेल म्हणून पीडित मुलगी हि क्रिकेटच्या सरावासाठी गेली असता त्या शिक्षकाने त्या पीडितेला ग्रंथालयात ये म्हणून बोलवले आणि
तिला म्हणाला कि तू मला खूप आवडते आणि पीडितेच्या डोक्यावर आणि पाठीवर हात फिरवले व तिला चिमटी घेऊन म्हणाला कि माझं तुझ्यात खूप जीव आहे तू मला तुझा निर्णय उद्यापर्यंत सांग त्यानंतर ती पीडिता तिथून घाबरून निघून गेली पीडिता घरी आल्यानंतर घडलेली घटना तिच्या आई वडिलांना सांगितली त्यावरून पीडितेच्या आई वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला धाव घेऊन
घडलेली सर्व घटना पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व पोलीस उपविगीय अधिकारी अमोल भरती यांना सांगितली असता त्या स्पोर्ट शिक्षक आरोपीवर गुन्हा रजिस्टर नंबर ८२३/२०२५ भारतीय न्याय संहिता ७५/१/i पॉस्को अंतर्गत ८,१२ एट्रोसिटी अंतर्गत ३ (i)(w) ३, (२) va नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ह्यावरून
आरोपी शिक्षक निलेश सुभाष सुराळे राहणार सावळीविहीर खुर्द यास अटक केली असून त्यास न्यायालयासमोर उभे करण्यात आलेले आहे पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत