शिर्डी, (प्रतिनिधी) –
शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर रस्त्यावर एक गंभीर मारहाण प्रकरण उघडकीस आले आहे. दिपक प्रमोद गोफणे (वय 19, व्यवसाय शिक्षण: डी. फार्मसी) यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 05/09/2025 रोजी रात्री सुमारे 09:30 वा. शिर्डी साईबाबा गेट नं. 5 समोर त्यांना दोन युवकांनी गंभीर मारहाण केली.
दिपक यांनी सांगितले की, त्यांच्या सोबत चालत असलेल्या मैत्रिणी निदा लुक्मान पटेल यांच्याशी बोलतानाच मेहफुज अहमद शेख (रा. पिंपळवाडी, ता. राहाता) यांनी दिपक यांना शिवीगाळ करून हातातील साईबाबाची मुर्ती त्यांच्या डोक्यात मारली. तसेच, त्यांना खाली पाडून जीवे मारण्याची धमकी दिली.
शिर्डी पोलीस स्टेशनकडे जात असताना, मेहफुजचा मित्र किरण वाल्मीक माळी देखील आले आणि दिपक यांना धरून खाली पाडून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर दिपक यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि ग्रामीण रुग्णालय, राहाता येथे उपचार घेतले.शिर्डी पोलीसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरु केला आहे.