Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
अ.नगरक्राईम

साईबाबांचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले असता भक्ताच्या २५ बॅगा चोरांनी केल्या लंपास

आंध्रप्रदेशातील येल्लूर गावचे भाविक शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी गुरुवारी आले होते. साई बाबांचे दर्शन झाल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने ते परतीच्या प्रवासासाठी शिर्डीतून निघाले. सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर येथे मारुतीच्या दर्शनासाठी निघाले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शुक्रवारी सकाळी सोलापूरात पोहोचले तेव्हा अनेक प्रवाशांना त्यांच्या बॅग गाडीच्या खालच्या बाजूला असलेल्या डिग्गीतून लंपास झाल्या असल्याचे निदर्शनास आले. जवळपास २५ प्रवाशांनी आपल्या बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोंधळ सुरू केला.खासगी बसमधील प्रवाशांनी बस थेट फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी केली.

तेलगू भाषेमुळे प्रवाशांना मराठीत तक्रार सांगता येत नव्हती. पण झालेले नुकसान आणि हावभाव यावरून पोलिसांनी त्यांची व्यथा जाणून तेलगु भाषिक पोलीसाची मदत घेवून व्यथा ऐकून घेतली. या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पहाटे चारच्या सुमारास माढा ते करमाळा दरम्यान प्रवासी झोपेत असताना बस थांबली होती.

चालक खाली उतरून काही जणांशी बोलत होता. एवढेच आम्हाला आठवते असे प्रवाशांनी तेलगू भाषा येणाऱ्या मराठी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. पोलिसांनी या माहितीच्या आधारावर चालक आणि त्याचा सहकारी यांचे जबाब नोंदवले.प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बॅगा चोरीचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका तर करमाळा तालुका दरम्यान घडली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button