Letest News
दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक
अ.नगरशिर्डी

गावठी कट्टा लावून व्यापाऱ्यास लुटले,गुन्हा नाही ?

कोपरगांव तालुक्यातील पोहेगाव ते देर्डे-कोऱ्हाळे या मार्गावर समृध्दी महामार्गाच्या पुलाखाली भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास नुकतीच तीन दरोडेखोरांनी आपल्या दुचाकीवर येवून एका येवला शहरातील प्लॅस्टिकच्या व्यापाऱ्याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्याच्या कडील सुमारे १२-१५ हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव आणि येवला आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात डझनावारी गावठी कट्टे आणि त्यासोबत डझनावार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.या गुन्ह्यात विक्रीसाठी आलेले गावठी कट्ट्यांसह आरोपी पकडले गेले,तरीही गावठी कट्टे आणि ते वापरणारे आरोपी कमी होण्याची कोणतीही शक्यता दृष्टी पथात असल्याचे दिसत नाही उलट गावठी कट्टे कोपरगाव सह नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.

त्यातून अनेक गुन्हे उघडकीस येत असून अनेक गुन्हे घडणार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.मात्र हे कट्टे येतात कुठून आणि त्यावर पोलिस प्रशासन करते तेरी काय ? असा सवाल सामान्य नागरिकांना न पडला तर नवल.अशीच गावठी कट्ट्याची आणि त्याच्या धाकातून लुटमारीची घटना उघड झाली असून यातील बाधित व्यापारी हा येवले या शहरातील असून तो प्लास्टिकचा व्यापार करतो.

तो पोहेगाव येथील आपले काम आटोपून देर्डे-कोऱ्हाळे मार्गाने जात असताना दुपारी १२ वाजेच्यां सुमारास त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या तीन तरुणांनी त्यांचा पटलाग करून त्यांना सदर पुलाखाली गाठले व त्या व्यापाऱ्यास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्या कडील सुमारे १२-१५ हजारांची रक्कम घेऊन पोबारा केला आहे.

त्यामुळे सदर व्यापारी आपला जीव वाचला (जान बचाई लाखो पाये…) या समाधानात तेथून काढता पाय घेतला आहे.मात्र त्याने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेला दुजोरा दिला आहे.मात्र या बाबत कोणीही पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नाही त्यामुळे पुढील कार्यवाही करता आली नाही अशी सबब दिली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button