
शिर्डी प्रतिनिधी/ अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी यांना हॉटेलमध्ये येणाऱ्या जोडप्यांना कागदपत्राची खातरजमा केल्याशिवाय हॉटेल चालक व मालकांनी रुम देऊ नये असे आव्हान जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व नव्याने पदभार घेतलेले पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी शिर्डीतील हॉटेल चालकांना यापूर्वीच केले असतानाही
तसेच हॉटेलच्या बाबतीत कठोर कारवाई सुरू असतानाही राजाश्रयाच्या जोरावर आजून सुद्धा काही हॉटेल चालक आपल्या आर्थिक फायद्यासाठी पोलिसांनी केलेल्या आव्हानाकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार शिर्डी शहरात नुकताच ४ सप्टेंबर २०२५ रोजी उघडकीस आला असून शिर्डी शहरातील हॉटेल बाबाज पॅलेस शिर्डी येथे घडला असून या हॉटेलचा मालक व कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीत दोन वेळा निवडणूक लढवलेला बाबा डमाळे असल्याचे देखील धक्कादायक माहिती पुढे आली आहे
अधिक माहिती अशी की हॉटेलचाचालक मॅनेजर संतोष भाऊसाहेब गव्हाळे राहणार श्रीरामनगर शिर्डी याने अल्पवयीन मुलगी व तिच्या सोबत आलेल्या मुलास आर्थिक फायद्यासाठी कुठलीही खातरजमा न करता रूम उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर सोबत आलेल्या मुलाने अत्याचार झाल्याचा देखील प्रकार पुढे आला असून
सदरच्या हॉटेलवर पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या पोलीस पथकाने कारवाई करुन हॉटेल चालक संतोष भाऊसाहेब गव्हाळे याला अटक करून राहता न्यायालय पुढे हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून हॉटेल मालक बाबा डमाळे याचा शोध सुरू आहे
शिर्डी पोलीसांनी संतोष गव्हाळे राहणार शिर्डी,व बाबा डमाळे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ८४८/२०२५ भारतीय न्याय संहिता ६५(१)सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४,८,१२,१७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या कारवाईत पोलीस कर्मचारी संतोष लांडे, गजानन गायकवाड, विजय धनगर, केवळ राजपूत ,महिला पोलिस प्रियका गुंड ,यांनी भाग घेतला होता
शिर्डी शहरात शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांच्या हॉटेलवर शिर्डी पोलिसांनी कारवाई करून चालक व मालकावर गुन्हा दाखल केल्याने शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे इतक्या मोठ्या नेत्यावर कारवाई करून जणू एकप्रकारचे बाकीच्या हॉटेल मालकांना व चालकांना पोलिसांनी संदेश दिला आहे कि अनाधिकृतपणे रूम भरणारे कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही

