शिर्डी ( प्रतिनिधी) बेंगलोर येथून आलेल्या साई भक्ताचे शिर्डी येथे लाडू प्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे असताना सुमारे 40 हजार रुपये चोरी गेले असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाल्यामुळे साई भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की
बेंगलोर येथील साईभक्त मनोज कुमार विजयराजू यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, आपण व आमचा परिवार
दि. 28/05/2025 रोजी बैंगलोर येथुन निघून शिर्डी येथे श्री साईबाबाचे दर्शनाकरीता आलो होतो..
दिनांक 30/05/2025 रोजी दुपारी 02/00वा. चे सुमारास मी श्री साईबाबाचे दर्शनाकरीता 2 नंबर गेटने आतमध्ये दर्शनासाठी माझी पत्नी तसेच दोन मुले असे आम्ही दर्शन करून नंतर रांगेत प्रसाद घेवुन रांगेतुन बाहेर 4 नंबर गेटने आलो व दुकानात खरेदीसाठी गेलो असता तेथे मी माझे पॅन्टचे खिशात ठेवलेले पैसे काढण्यासाठी गेलो असता मला माझे खिशात पैसे मिळून आले नाही.
त्यावेळी मी तेथे आजुबाजुला शोध घेतला असता माझे पॅन्टचे खिशात असलेले 40 हजार रूपये मला मिळुन आले नाही. त्यावेळी आम्ही श्री साईबाबा मंदीरात जावुन तेथे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आम्ही ज्या वेळेस दर्शन घेवुन बाहेर आलो. त्यावेळी मंदीर परिसरात लाडु काउंटरचे लाईन मध्ये उभे असतांना आमचे पाठीमागे एक सफेद रंगाचा शर्ट घातलेला इसम उभा होता.
त्याने माझे खिशातुन पैसे काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात दिसत असून तो इसम 4 नंबर गेटने पैसे घेवुन जातांना दिसत आहे. माझे लाडू काउंटर च्या रांगेतून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लाईन मध्ये उभा असताना माझे पॅन्टचे पाठीमागील खिशातुन 40 हजार रुपये काढुन घेतले.
अशा आशयाची फिर्याद बेंगलोर येथील साई भक्त मनोज कुमार विजय राजू यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 594/ 2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 303 (दोन )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.