
केंद्र सरकार तरुणांसाठी एक नवी योजना सुरु करणार आहे. यामुळे तरुणांना नोकरी मिळण्यात मदत होईल. तसंच त्यांना दिलासा म्हणून दर महिन्याला 5 हजार रुपये दिले जातील. ही एक नवी योजना असेल, जिच्या गाईडलाईन्स लवकरच जारी केल्या जाण्याची शक्यता आहे.
सरकार तरुणांसाठी या योजनेअंतर्गत नवं पोर्टलही डेव्हलप करणार आहे.अर्थसंकल्प 2024 मध्ये इंटर्नशीप योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या योजनेचा शुभारंभ करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. सीएनबीसी-टीव्ही 18 च्या एका रिपोर्टनुसार,
केंद्र सरकारचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय लवकरच केंद्र सरकारची इंटर्नशिप योजना सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. ही योजना पुढच्या आठवड्यात केव्हाही सुरू केली जाऊ शकते. याशिवाय, एक समर्पित इंटर्नशिप पोर्टल देखील सुरू केले जाईल.