राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव यापुढे राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या संदर्भातील घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
दरम्यान, या उत्सवासाठी आवश्यक निधी खर्च करण्याची तयारीही शेलार यांनी बोलून दाखविली.पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करताना आनंद होत असल्याचे शेलार यांनी या वेळी नमूद केले.
ही मागणी करताना हेमंत रासने म्हणाले, ‘सार्वजनिक गणेशोत्सवाने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते घडविण्याचे काम केले, प्रबोधनाची परंपरा चालविली. शतकाचा वारसा असलेल्या या उत्सवावर निर्बंधांचे प्रमाण वाढत आहे.’ या उत्सवासाठी शंभर कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणीही रासने यांनी केली.