कुठलेही अनुचित प्रकार न घडता कुठलेही गालबोट न लगता गुरुपौर्णिमा मोठ्या उत्सवात साजरा
शिर्डी मध्ये बऱ्याच दिवसांपासून एवढी गर्दी झाली नाही अशी उचांकी गर्दी यावर्षी गुरु पौर्णिमेला झाली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दीचे नियोजन केले, भक्तांची काही ठिकाणी थोडी गैरसोय झाली परंतु कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. गावकरी, वयस्कर आणि चार नंबर गेट हे मंदिर गाभाऱ्यातील गर्दी नियमनाकरिता दिवसाभरातुन काही तासाकरिता बंद केले. याला गावकरींनी अनुमोदन देखील दिले. परंतु त्याच वेळी गेट 1 आणि गेट नं 2 हे देखील दुपार पर्यंत अति महत्वाचे व्यक्त्तींकरिता पूर्णपणे बंद केले होते. तसेच सर्व विभागाचे प्रोटोकॉल बंद होते.पोलीस प्रशासन आणि संस्थान प्रशासन यांच्या समन्वयातून गर्दीचे नियोजन करत असतांना काही वेळा कठोर भूमिका घेऊन, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू दिला नाही. सध्या वेशातील पोलीस आणि संस्थान सुरक्षा विभागाचे सिविल पथक अथक दोन शिफ्ट मध्ये गर्दी मध्ये कार्यरत होते. त्याचा परिणाम असा झाला कि, उचांकी गर्दी असून देखील मंदिर परिसरात तसेच रथ मिरवणुकीत एकही चोरी झाली नाही.