Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रूम सोबत दुसरी महिला हॉटेलमधील फोटो पाहून बायकोला धक्का

शिर्डी | प्रतिनिधी : पत्नीच्या नावाने आणि तिच्या शासकीय ओळखपत्राचा कथित गैरवापर करून हॉटेलमध्ये रूम बुक करणे आणि त्याच रूममध्ये पतीने दुसऱ्या महिलेसोबत मुक्काम केल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीत समोर आला आहे. विशेष म्हणजे पती घरातून बेपत्ता झाल्यानंतर पत्नीने पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली होती. मात्र, त्याच काळात आपल्या नावाने शिर्डीतील साई पॅलेस एक्सप्रेस मध्ये रूम बुक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने हॉटेल व्यवस्थापनाकडे चौकशी केली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पत्नीने शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय ओळखपत्राचा गैरवापर, दुसऱ्याच्या नावाने हॉटेल रूम बुक करणे आणि आपली ओळख लपवून रूम घेतल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पती बेपत्ता झाल्याने पत्नीची पोलिसांत धाव
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, २९ मे २०२६ रोजी पती घरातून निघून गेले होते. बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने पत्नीने ४ जून रोजी नेरुळ पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची मिसिंग तक्रार दाखल केली. त्यानंतर १६ जून रोजी ते घरी परतले.
मात्र, या संपूर्ण कालावधीत पती नेमके कुठे होते, याबाबत पत्नीला माहिती नव्हती. दरम्यान, १४ जून रोजी तिला शिर्डीतील साई पॅलेस एक्सप्रेस मध्येतिच्याच नावाने २९ मे रोजी रूम बुक करण्यात आल्याची माहिती मिळाली.
हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क; फोटो मागवताच धक्कादायक माहिती
ही माहिती मिळाल्यानंतर पत्नीने संबंधित हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला. आपल्या नावाने रूम कोणी बुक केली होती, याची माहिती घेत त्यांनी रूम बुक करणाऱ्या व्यक्तीचा फोटो पाठविण्याची विनंती केली.


हॉटेल व्यवस्थापनाकडून व्हॉट्सॲपवर फोटो मिळाल्यानंतर पत्नीला धक्काच बसला. फोटोमध्ये आपले पती एका महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे दिसून आल्याचा दावा त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
बायकोच्या नावाने रूम; ओळखपत्राचाही वापर?
पत्नीच्या नावाने तसेच तिच्या शासकीय ओळखपत्राचा वापर करून रूम बुक करण्यात आली. आपणच असल्याचे भासवून हॉटेलमध्ये रूम घेण्यात आली, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे आपल्या नावाचा आणि ओळखपत्राचा गैरवापर झाला असून आपली मानसिक फसवणूक झाल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.


रात्री साडेदहा वाजता शिर्डीतील हॉटेलमध्ये मुक्काम
२९ मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल साई पॅलेस एक्सप्रेस, शिर्डी येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हॉटेलमध्ये रूम बुक करताना वापरण्यात आलेली कागदपत्रे, रूम बुकिंगची नोंद आणि त्या दिवशी हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची माहिती या तपासाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.


सीसीटीव्ही आणि हॉटेल रेकॉर्ड तपासणार
या प्रकरणात पोलिसांकडून हॉटेलच्या रूम बुकिंगचे रेकॉर्ड, वापरण्यात आलेले ओळखपत्र, सीसीटीव्ही फुटेज, हॉटेलमधील नोंदी तसेच संबंधित व्यक्तींच्या हालचालींची माहिती तपासली जाण्याची शक्यता आहे. ओळखपत्राचा प्रत्यक्ष वापर कोणी केला, रूम कोणी बुक केली आणि हॉटेलमध्ये कोण कोण मुक्कामी होते, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
पत्नीच्या नावाचा आणि शासकीय ओळखपत्राचा कथित गैरवापर करून हॉटेलमध्ये रूम घेण्यात आल्याच्या या प्रकारामुळे शिर्डीत चर्चेला उधाण आले आहे. मात्र, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button