Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरक्राईम

वाह रे….! अकार्यक्षम पोलीस अधीक्षक राकेश ओलांचे अकार्यक्षम पोलिस ?, नशेली इंजेक्शन विकणारा हाताला हिसका मारुन पोलिस ठाण्यातून पळून जातो !!

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-
जिममधील मुलांना देण्यात येणारे नशीचे इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या आरोपीला खंडाळ्याजवळ इंजेक्शनसह पकडण्यात आले आहे. मात्र, श्रीरामपूर शहर पोलीस हे त्याची पोलीस चौकशी करत असताना हा आरोपी मध्यरात्री पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याबाबातची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, खंडाळा येथे जावेद सिराज शेख, रा.लोणी, ता. राहाता हा खंडाळा येथील श्रीरामपूर-बाभळेश्वर रोडवरील बाबासाहेब काळे यांच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोडवर नशेचे इंजेक्शन विक्री करताना आढळला होता.परवाना नसताना सदर औषधांची खरेदी तसेच बिलाशिवाय त्याची विक्री ही जिममधील तरूणांना तसेच इतर ग्राहकांना करण्यासाठी आणले आहेत.

तेव्हा पोलिसांनी काल दि.२४ फेब्रुवारी रोजी २ च्या सुमारास सदर ठिकाणी जाऊन
सापळा लावून आरोपी जावेद शेख याला ताव्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे परवाना नसलेल्या आणि शरीराला अपाय होऊ शकतो असे अपायकारक, गुगीकांरक औषधांचे इंजेक्शान आढळून आले. पोलिसांनी सुरुवातीला या ठिकाणी डमी ग्राहक पाठवून शेख याच्याकडून सेवन करण्याकरीता इंजेक्शनची मागणी केल्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीला रंगेहाथ पकडले. सदर आरोपीला पकडून श्रीरामपूर पोलिसांनी शहर पोलीस स्टेशनला आणले.

त्याच्याकडून पोलिसांनी ८३,२३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात २,०३२ रूपयांचे टरमीन इंजेक्शन , २ बाटल्या आणि ८०,७०० रूपयांची सुझुकी मोटारसायकला ताब्यात घोतली. सदर आरोपीला पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो सदर इंजेक्शन कोठून आणले? कोणाला विकतो? असे तपास करत असताना तो पोलिसांच्या हाताला झटका देवून हा आरोपी जावेद शेखा पोलीस स्टेशनामाधून पळाला. श्रीरामपूर शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button