शिर्डी
आयआरसीटीसीने शिर्डीसाठी एक नवे टूर पॅकेज लाँच केले

तुम्ही साईभक्त असाल आणि कुटुंब, मित्रपरिवारासह शिर्डी साईमंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे.आयआरसीटीसीच्या या पॅकेजचे नाव साई शिवम असे असून तुम्ही 3 रात्री आणि 4 दिवस या पॅकेजअंतर्गत प्रवास करु शकता. रेल्वेच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रवास करायचा आहे. ही ट्रेन शिर्डी येथे थांबेल.आयआरसीटीसीच्या शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर पॅकेजमधून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार आहे. कारण या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला स्लीपर आणि 3AC क्लास ट्रेनची तिकिटे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तसेच या टूर पॅकेजमध्ये नाश्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सहभागी प्रवाशांना विमा सुविधा देखील उपलब्ध असेल,
जाहिरात
DN SPORTS