Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
अ.नगरक्राईम

शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का?

शिर्डी | प्रतिनिधी :
शिर्डी शहर व परिसरातील अवैध दारू आणि गुटखा विक्रीविरोधात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने दैनिक साईदर्शनने आवाज उठविला आहे. प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री, साठवणूक आणि तस्करीबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध करून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, अनेकदा तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने अखेर वरिष्ठ पातळीवर साकडे घालण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत शिर्डीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करत तब्बल १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
या कारवाईनंतर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, अनेकांनी फोन व संदेशाद्वारे या पाठपुराव्याचे कौतुक केले. मात्र, आता नागरिकांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे—गुटखा तस्करी करणाऱ्या व्यक्तींमागे नेमका सूत्रधार कोण आहे?

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‘आका’पर्यंत पोहोचल्याशिवाय गुटख्याची साखळी तुटणार नाही!
शिर्डीत गुटखा तस्करी करणारे केवळ प्यादे आहेत का? त्यांना माल पुरविणारा, आर्थिक पाठबळ देणारा किंवा संपूर्ण नेटवर्क नियंत्रित करणारा कोणी ‘आका’ आहे का? हा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
 या आरोपाची कोणतीही पूर्वकल्पना न करता, पोलिसांनी संबंधित आरोपींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करावी
गुटखा तस्करीचे जाळे मोडायचे असेल तर केवळ माल जप्त करून किंवा किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून उपयोग होणार नाही. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा कुठून होतो, माल कोण आणतो, कोणाला पुरविला जातो, पैशांचे व्यवहार कोणामार्फत होतात आणि या संपूर्ण साखळीमागे कोणाचे आर्थिक पाठबळ आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे.
त्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्या मोबाईल संपर्कांचा, आर्थिक व्यवहारांचा, पुरवठा साखळीचा आणि गुटखा कुठून येतो याचा तपास करावा. या तपासातून जर कोणत्याही मोठ्या सूत्रधाराचे नाव समोर आले, तर त्याच्यावरही कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.


‘प्याद्यां’वर कारवाई झाली; आता ‘आका’पर्यंत पोहोचणार का?
शिर्डीतील नागरिकांचा प्रश्न अगदी स्पष्ट आहे—१२ जणांवर गुन्हे दाखल झाले, ही कारवाई स्वागतार्ह आहे; मात्र या गुटखा तस्करीच्या व्यवसायामागे मोठे नाव किंवा सूत्रधार असेल तर त्याच्यावर कारवाई कधी होणार?
पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास करावा. नागरिकांनी व्यक्त केलेला संशय खरा आहे की निराधार, हे तपासातून स्पष्ट होऊ द्यावे. मात्र, संशयित व्यक्ती जर खरोखरच या तस्करीच्या नेटवर्कशी जोडलेली आढळली तर ‘आका’ कोणताही असो, त्याच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी शिर्डीकरांची मागणी आहे.
गुटखा तस्करीची मुळे उखडायची असतील, तर केवळ विक्रेत्यांवर नव्हे तर या काळ्या धंद्याच्या सूत्रधारापर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणे आवश्यक आहे.

जनहितार्थ आवाहन

गुटखा तस्करीच्या कथित ‘आका’बाबत कोणाला ठोस माहिती असल्यास पोलिसांना कळवा!

शिर्डीतील गुटखा तस्करीच्या मुळाशी कोण आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील कथित सूत्रधार किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तींबाबत ठोस व सत्य माहिती, पुरावे किंवा महत्त्वाची माहिती कोणाकडे असल्यास ती तात्काळ संबंधित पोलिस यंत्रणेला कळवावी.

तसेच माहिती दैनिक साईदर्शनकडेही देता येईल. मात्र, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अफवा किंवा अप्रमाणित आरोप न करता केवळ सत्य व पडताळता येणारी माहितीच द्यावी.

गुटखा तस्करीचे जाळे उखडून काढण्यासाठी नागरिकांनी पुढे येणे हीच काळाची गरज आहे.
आपली माहिती एखाद्या मोठ्या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश करण्यास मदत करू शकते.

— जनहितार्थ प्रसारित

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button