अहिल्यानगर (प्रतिनिधी) – दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे सकाळी 6.30 वाजता, सुपा पोलीस ठाणे हद्दीत नारायणगव्हान (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे, पुणे–नगर हायवेपासून सुमारे 100 मीटर अंतरावर एका अंदाजे 25 ते 30 वयोगटातील अज्ञात पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे.
सदर घटनेची नोंद सुपा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
🧍♂️ मयताचे शारीरिक वर्णन पुढीलप्रमाणे
वय: अंदाजे 25 ते 30 वर्षे
उंची: अंदाजे 5 फुट 5 इंच
रंग: गोरा
केस: कुरळे
अंगावर: प्रिंटेड गुलाबी रंगाचा फुलबाहीचा शर्ट व काळ्या रंगाची ARMANI पॅन्ट
🪶 विशेष ओळखण्याजोग्या खूणा
डाव्या कानाखाली “आई” असे गोंदलेले
उजव्या हातावर “क्षत्रिय कुलवंतस” व गणपतीचे टॅटू
उजव्या हातावर लाल व भगव्या रंगाचे दोरे
दोन्ही पायांच्या अंगठ्या
डाव्या पंज्याजवळ जुन्या जखमेची खुण
📞 माहिती असल्यास संपर्क साधावा
सदर व्यक्तीबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास किंवा आपल्या परिसरातून अशा प्रकारे हरवलेली व्यक्ती मिसिंग असल्याची माहिती असल्यास, कृपया तत्काळ सुपा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
संपर्क अधिकारी:
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी
सुपा पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर
📱 मो. 97638 90223
📰 दैनिक साई दर्शन – अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
