
शिर्डी (प्रतिनिधी) —
शिर्डी शहरातील पोलिस मित्र म्हणून कार्यरत आणि सामाजिक उपक्रमांत नेहमी पुढे असलेले सुदर्शन सुभाष गोंदकर (पुतण्या – प्रा. तानाजी गोंदकर सर) यांचे आज सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.
हा अपघात वाकडी गावाजवळ रिक्षा आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या धडकेत झाला असून, त्यानंतर सुदर्शन यांना पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ही बातमी समजताच संपूर्ण शिर्डी शहरात हळहळ पसरली आहे.
सुदर्शन हे त्यांच्या हसमुख, मदतीच्या स्वभावामुळे आणि पोलीस मित्र म्हणून सक्रिय सहभागामुळे सर्वांनाच परिचित होते.
शिर्डी शहरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मनापासून सहभाग नोंदवला होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने मित्रमंडळी, समाजसेवी संघटना आणि शिर्डी पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
💔 अजूनही मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे…
सुदर्शन यांच्या पत्नी गर्भवती असून,
त्यांच्या पोटातील बालकाला बापाचे तोंडही पाहता आले नाही.
त्यांना चार वर्षांचा एक मुलगा असून, या घटनेमुळे संपूर्ण गोंदकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
🕊️ अंत्यविधी आज दुपारी अमरधाम येथे
सुदर्शन गोंदकर यांचा अंत्यविधी आज दि. 07 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता शिर्डी येथील अमरधाम येथे होणार आहे.
स्थानिक नागरिक, मित्रपरिवार आणि पोलीस दलातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, हीच सर्वांची प्रार्थना. 🙏
🙏🏻 शोकाकुल परिवार 🙏🏻
श्री. कोंडाजी सखाराम गोंदकर (आजोबा)
श्री. तानाजी वामन गोंदकर
श्री. संतोष कोंडाजी गोंदकर
व गोंदकर पा. परिवार, शिर्डी
🕯️ दैनिक साईदर्शन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
