
शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी कडून बेंगलोरकडे कांदा घेऊन जाणारी आयशर क्रमांक एम एच १५,एफ व्हि ४०९०हि घेऊन जात असताना 31 सप्टेंबर रोजी २,३० वाजेच्या सुमारास शिर्डी बायपास रोडवर एक दुचाकी वर बसून तिघेजण गाडीचा पाठलाग करत होते दोघजणांनी गाडीवरती चढून मारहाण करत चाकूचा धाक दाखवून ७हजार रुपये किमतीचा मोबाईल व रोख२९००रुपये घेऊन पळ काढला

गाडी थांबून लगेच उभे असलेल्या शिर्डी वाहतूक पोलिसांना या घटनेची माहिती देताच काही वेळातच पोलिसांची गाडी आल्यानंतर त्यांच्या समक्ष सदर आरोपीचा शोध घेतला असता तिघेजण एका दुचाकी वर उभे असल्याचे दिसले सदरचे आरोपी हीच असल्याचे निष्पन्न होताच त्यांना ताब्यात घेतले मात्र त्यांना नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नाव रोहित बंडू खरात वय २५ व विनायक संजय गवळी सर्व राहणार शिर्डी असे सांगितले
मात्र या झटपटीत दुचाकी वर असलेला सौरभ रोजारीओ राहणार शिर्डी हा दुचाकी घेऊन पसार झाला असून त्याचा शोध शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अशाप्रकारे वाहन उठणाऱ्या आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले
असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे शिडी पोलिसांनी सांगितले वाहन चालक रशिद अन्सारी त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे

