Letest News
साईनगरीत वेषांतर गँगचा पर्दाफाश-ब्लेडने पर्स कापून चोरीचा डाव फसला! शिवरायांच्या आदर्श राज्यकारभाराचा संदेश- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे प्रेरणादायी विचार “मोठ्या स्वप्नांच्या उंबरठ्यावर… साईचरणी सोनू सूद”साईबाबाच माझ्यासाठी पद्मश्री!” — सोनू सूद यांची भा... साईभक्तांकडून २० लाखांची अत्याधुनिक रुग्णवाहिका साई संस्थानच्या आरोग्यसेवेला नवे बळ ४१ कोटींचा स्फोट-१४ वर्षांचे लेखापरीक्षण संशयाच्या भोवऱ्यात-सत्य बाहेर काढण्यासाठी विशेष चौकशीची माग... ८.७० लाखांचे सोनं गायब-ज्येष्ठ महिलेची तक्रार-शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-तपासाला वेग शिर्डी शहरात देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी साईप्रसादालयात हरवली अंगठी… पण जिंकला विश्वास ६० हजारांची वस्तू प्रामाणिकपणे परत माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये शिर्डी नगरपरिषद प्रथम ७५ लाखांच्या बक्षिसाची मानकरी शिवजयंतीनिमित्त शिर्डीतील जेष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ यांच्या घरी भक्तिभावाने शिवपूजन
संपादकीय

मृतांचा खच पाहून शिपायाला हार्ट अटॅक

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बाबांच्या दरबारात मृतदेहांचा ढीग पडला होता. काही वेळातच संपूर्ण परिसर स्मशानभूमी बनला. या घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या सत्संगाचे आयोजन नारायण साकार हरी नावाचे बाबा करत होते. बाबांकडून आशीर्वाद घेण्यासाठी एक लाखापेक्षा अधिक भाविक पोहोचले होते. हातरस दुर्घटनेच्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जे सांगितले ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. अपघात होताच हे लोक बसने घरी परतले. एका व्यक्तीने सांगितले की आमच्या आधी दोन लोकांचा मृत्यू झाला होता, आम्ही नशीबवान आहोत की आम्ही वाचलो

.हाथरस येथील दुर्दैवी घटनेनंतर क्युआरटीच्या ड्युटीवर तैनात असलेले शिपाई रवी यादव (राहणारे अलीगड) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे.

रवी यादव यांची ड्युटी मृचदेहांची व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. याबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक जगदीश चंद्र मौर्य यांनी सांगितलं की, शिपाई रवी यादव यांची ड्युटी हाथरस दुर्घटनेत मृतदेहांच व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. ड्युटी दरम्यानच त्यांना हार्ट अटॅक आला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button