शिर्डी – शहरातील ज्येष्ठ नेते, मूळ रहिवाशी घराण्याचे प्रतिनिधी आणि न्यायविधी तज्ञ अॅड. अनिल शेजवळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या थेट आणि तुफानी पोस्टमुळे शिर्डीच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडाली आहे.
शहरातील सध्याच्या राजकीय उलथापालथीवर त्यांनी व्यक्त केलेली नाराजी ही थेट, धारदार आणि निशाण साधणारी आहे.
“गावकारभार्यांचे आभार… गुन्हेगार प्रवृत्तीला दूर ठेवले”
शेजवळ यांनी आपल्या पोस्टमध्ये गावकारभार्यांचे आभार मानले.
त्यांनी स्पष्ट लिहिले की —
शिर्डीत शेजवळ, गायकवाड यांसारख्या मूळ रहिवाशी घराण्यांना बाजूला ठेवून,
गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना राजकारणापासून दूर ठेवण्याचे काम गावकारभार्यांनी योग्य रीतीने केले.
“सुजय विखे यांनी तंबी दिली होती… पण निर्णय वेगळाच!”
निवडणुकीची घोषणा होताच खासदार सुजय विखे-पाटील यांनी सर्वांसमोर दोन स्पष्ट मुद्दे सांगितले होते—
👉 गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना तिकीट नाही.
👉 स्वच्छ व निष्कलंक प्रतिमेच्या नवीन चेहऱ्यांना संधी.
मात्र, प्रत्यक्षात मात्र हेच निकष पाळले गेले काय?
याच प्रश्नाची कडवट टोचणी शेजवळ यांनी आपल्या पोस्टमधून लावली आहे.
**”ज्यांनी पडे भोगली त्यांनाच संधी?
स्वच्छ प्रतिमेच्या स्थानिकांना डावलले?” — शेजवळ यांची थेट थेट टीका**
अॅड. शेजवळ यांचे आरोप थेट आहेत:
🔴 ज्या उमेदवाराची शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे…
🔴 ज्यांच्या विरोधात अनेक आरोप झाले…
🔴 ज्यांनी आधीच पडे भोगल्या…
त्यांनाच आज उमेदवारी कशी?
मग ‘स्वच्छ प्रतिमा’ आणि ‘नवीन चेहरा’ ही सुजय विखेंची अट कुठे गेली?
असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“माझी नाराजी विखे कुटुंबावर नाही… पण ठराविक चांडाल चौकडीने काने भरली!”
अॅड. शेजवळ म्हणतात —
“विखे कुटुंबियांवर माझी ना नाराजी, ना आरोप.
परंतु काही ठराविक चांडाल चौकडीने काने भरून
स्वच्छ प्रतिमेच्या स्थानिकांना मागे ढकलले.
मी स्वतःसह अनेक निष्कलंक इच्छुक उमेदवार होते.
मग आम्हाला का टाळले?”
ही वाक्ये शिर्डी शहरातील वातावरण अधिकच तापवणारी ठरली आहेत.
शिर्डीत तापलेले राजकारण – मोठ्या उलथापालथीची चाहूल
अनिल शेजवळ यांच्या या पोस्टनंतर शहरात चर्चांना उधाण आले आहे—
🔸 सुजय विखेंची ग्वाही मोडली गेली का?
🔸 गुन्हेगार प्रवृत्तीला दूर ठेवण्याचा शब्द पाळला गेला नाही का?
🔸 स्वच्छ प्रतिमेचे मूळ रहिवाशी नेते का बाजूला ढकलले गेले?
🔸 कोण आहे ही “चांडाल चौकडी”?
शिर्डीतील राजकीय समीकरणे आता वेगाने बदलत आहेत.
आणखी पोस्ट्स, प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप यांची मालिका आता सुरू होण्याची शक्यता.
अनेक स्वच्छ, नवीन चेहऱ्यांचे उमेदवार होते… पण चांडाल चौकडीने ‘आपला माणूस’ पुढे केला!”
शेजवळ यांनी आपल्या पोस्टमध्ये आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत म्हटले आहे की—
शिर्डीत अनेक नवीन, तरुण, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी पूर्णपणे पात्र होते.
स्थानिक, समर्पित आणि कोणत्याही आरोपांपासून मुक्त अशी माणसे शिर्डीत मुबलक होती.
परंतु, शहरातील ठराविक चांडाल चौकडीने
“आपल्या कानाखालचा असावा”,
“आपण सांगू तसा वागणारा असावा”,
“आपल्या इशाऱ्यावर नाचणारा असावा”
अशाच विचाराने
वादग्रस्त, आरोप झालेले आणि शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू असलेल्या व्यक्तीचा आग्रह धरत
त्याचेच नाव पुढे केले,”
असा थेट आरोप शेजवळ यांनी केला आहे.
ते पुढे म्हणतात—
“अनेक चांगल्या, स्वच्छ प्रतिमेच्या स्थानिक उमेदवारांना त्यात शेजवळ,,गायकवाड,, आरणे,,, त्रिभुवन,,,यांना सहज संधी देता आली असती…
परंतु चांडाल चौकडीने स्वार्थासाठी त्यांनी दुर्लक्ष केले.”
