Letest News
पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख... शिर्डी मतदारसंघात मतदारांची धक्कादायक घट ४० हजारांहून अधिक अर्ज जमा नाहीत! सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ...
अ.नगरक्राईम

शनिशिंगणापूरमध्ये शनीभक्तांना अडवून-वाहनांचा पाठलाग करून पूजा साहित्य खरेदीस भाग पाडणाऱ्या ‘लटकूं’वर अखेर पोलिसांची धडक कारवाई

सोनई | प्रतिनिधी
शनिशिंगणापूर देवस्थान परिसरात शनीभक्तांची बळजबरीने लूट करणाऱ्या तथाकथित ‘लटकू’ गँगवर अखेर पोलिसांनी पहिलीच ठोस आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. पूजा साहित्य विक्रीच्या नावाखाली शनीभक्तांना अडवून, वाहनांचा पाठलाग करून विशिष्ट दुकानांकडे नेणाऱ्या लटकूंना रंगेहाथ पकडत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत विलास चव्हाण, ऋषिकेश संपत पवार आणि उद्देश दिलीप गव्हाणे या आरोपींचा समावेश असून, यामुळे शनिशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच लटकूंवर थेट गुन्हा दाखल झाल्याची नोंद झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

🔴 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अंमलबजावणी
दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त तथा देवस्थान प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आढावा बैठकीत लटकूंचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला होता. शनीभक्तांची होणारी अरेरावी, मानसिक त्रास आणि आर्थिक लूट लक्षात घेऊन डॉ. गेडाम यांनी लटकूंवर तात्काळ कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी थेट कृती करत विक्रेते व लटकूंवर गुन्हा दाखल केला.


🛑 राहुरी–शिंगणापूर रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
शिंगणापूर–राहुरी मार्गावर ठिकठिकाणी लटकू शनीभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करत जबरदस्ती करत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने बॅरिकेट्स लावून पोलिस यंत्रणा सक्रिय केली आहे. यामुळे लटकूंच्या मुसक्या आवळल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे.


⚠️ पुन्हा प्रकार आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा
मंदिर परिसरात किंवा रस्त्यावर अशा प्रकारचे गैरकृत्य आढळल्यास केवळ लटकूच नव्हे तर पूजा साहित्य विक्रेते, दुकान मालक आणि वाहनतळ मालकांवरही थेट कारवाई केली जाईल, असा कडक इशारा सपोनि आशीष शेळके यांनी दिला आहे.


🙏 शनीभक्तांत समाधान, प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव
या निर्णायक कारवाईमुळे शनीभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जोरदार कौतुक केले जात आहे. “ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवावी,” अशी मागणी जोर धरू लागली आहे.


📢 राज्यभरात संदेश, देवस्थानाची प्रतिमा उजळली
शनिशिंगणापूरमधील या कारवाईचा संदेश राज्यभर पोहोचत असून, देवस्थानाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट होत आहे. दिवसेंदिवस शनीभक्तांची संख्या वाढत असताना, मनमोकळेपणाने आणि भयमुक्त शनी दर्शन हीच प्रशासनाची ठाम भूमिका स्पष्ट झाली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button