शिर्डी परिसरातील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायंकाळी नऊच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर अचानक निखळून पडला. या वेळी रस्त्यावर अन्य वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
खड्ड्यांनी व्यापलेले रस्ते — नागरिकांचे मणके आऊट, वाहनांचे नुकसान
शिर्डीच्या रस्त्यांची अवस्था एवढी दयनीय झाली आहे की, वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मोठमोठे खड्डे, निखळलेले डांबर आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहने बिघडत आहेत. नागरिकांना पाठदुखी, कंबरदुखी अशा समस्या जाणवत असून, प्रशासन मात्र मौन बाळगून आहे.
अपघातानंतर रस्ता बंद — जेसीबीने ऊस काढण्याचे काम सुरू
अपघातानंतर संपूर्ण रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉलीमधील ऊस काढण्याचे काम सुरू होते. या दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.
“रस्ता इतका खड्डेमय आहे की, कोणत्याही क्षणी जीवघेणा अपघात होऊ शकतो,” असे नागरिकांनी सांगितले.
नामदार विखे शिर्डीच्या रस्त्याकडे लक्ष देतील का? — नागरिकांचा सवाल
या रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता नागरिकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे —
“नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात शिर्डी आहे, तरी रस्त्यांचे हाल एवढे वाईट का? प्रशासन व जनप्रतिनिधी लक्ष कधी देणार?”
नागरिकांच्या भावना प्रखर असून, रस्त्यांची दुरुस्ती तातडीने व्हावी अशी सर्वांची मागणी आहे. तोपर्यंत वाहनचालकांकडे सावधगिरी बाळगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
संपादकीय विश्लेषण : रस्ते खड्डेमय, प्रशासन मौन — शिर्डीकरांचा संयम संपतोय का?
साईनगरीचा रस्ता की खड्ड्यांचं राज्य?
साईबाबांच्या पवित्र भूमीत म्हणजेच शिर्डीत आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, रस्ता आहे की खड्ड्यांची साखळी — हेच कळत नाही. कुठे ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटते, कुठे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात येतो. नागरिकांनी खड्याची अवस्था बाबत कोणाला प्रश्न आता विचारावं असं झालं आहे — “साईंच्या शिर्डीत एवढं दुर्लक्ष का?”
अपघातानं नव्हे, खड्ड्यानं घेतले प्राण
अलीकडील नगर मनमाड रोडवर अपघातात ऊसवाहतूक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर निखळला, आणि सुदैवानं मोठा अनर्थ टळला. पण या घटनेनं एकच सत्य समोर आणलं — शिर्डीचे रस्ते आता अपघातांना आमंत्रण देत आहेत.
या रस्त्यांनी आधीच अनेक निष्पापांचे बळी घेतले आहेत, आणि जर दुर्लक्ष असंच सुरू राहिलं तर पुढचा बळी कोणाचा असेल हे सांगता येणार नाही.
नागरिकांचा संताप — “ना. विखे लक्ष द्या!”
नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात शिर्डीचा समावेश असूनही, रस्त्यांची अवस्था दरवर्षी अधिकच बिकट होत चालली आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघेही मौन बाळगून आहेत.
नागरिकांचा सवाल अटळ आहे —
“साईबाबांच्या भक्तांनी जगाला मार्ग दाखवला, पण शिर्डीच्या रस्त्यांना दिशा कोण देणार?”
खड्ड्यांवर झाक, पण जबाबदारीवर नाही!
कधी तरी थोडं खडी टाकून, थोडं डांबर ओतून फोटो काढले जातात, पण वास्तवात नागरिकांना त्याचा काहीच फायदा होत नाही.
प्रत्येक पावसात रस्ते पुन्हा धोकादायक होतात.
ही ‘डागडुजी’ नव्हे, तर “डागावर तात्पुरता मलम” आहे.
