Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरक्राईम

गोहत्या व गोमांस तस्करी करणाऱ्यांना हद्दपारीचा ‘तडाखा’ पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कठोर कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ 

नूतन आलेले एसपी सोमनाथ घार्गे यांनी आणखी कठोर भुमिका घेत गोहत्याबंदी कायदाचे उल्लघंन करून गोहत्या व गोमांस तस्करी करणाऱ्यांना हद्दपारीचा ‘तडाखा’ दिला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या बाबत अधिक माहीती अशी की, अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावरून या कठोर कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख ओवेस शेख (वय २४ रा. झेंडीगेट), शोएब कुरेशी (वय २८, बाबा बंगाली), फैसल शेख (वय १९, रा. हमालवाडा) व मुसावीर कुरेशी (वय २२, रा. झेंडीगेट) यांचा समावेश आहे.

झेंडीगेट परिसरात गोवंश ‘कत्तलीचा आणि गौमांस विक्रीचा व्यवसाय गेल्या काही काळात जोरात सुरू होता. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी वेळोवेळी छापे टाकत गुन्हे नोंदवले होते. संशयित आरोपींनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते.

या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरावे गोळा करून सदर प्रस्ताव अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. चौकशीत संशयित आरोपींकडे त्यांच्याविरुद्ध असलेल्या आरोपांचे पाच समाधानकारक उत्तर नव्हते.

त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा विचार करता, सामाजिक शांतता भंग होऊ नये, म्हणून त्यांना एक वर्षासाठी जिल्ह्याच्या हद्दीबाहेर हद्दाबाहर हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनामुळे या कारवाईमध्ये

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, योगिता कोकाटे, तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी हवालदार संदीप पितळे, रोहिणी दरंदले, शिल्पा कांबळे, दिपक रोहोकले, तानाजी पवार, सुरज कदम, सचिन लोळगे, राम हंडाळ, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, महेश पवार, सोमनाथ राऊत, राहुल मासाळकर, प्रतिभा नागरे आणि मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी विशेष मेहनत घेतली.

दरम्यान पुन्हा पुन्हा त्याच त्याच भागात गोहत्या व गोमांस विक्री तस्करी करणाऱ्यांना आता एसपी सोमनाथ घार्गे यांच्या हद्दपारीच्या ॲक्शनने निश्चीतच धडकी भरली असणार कारण आता पुढचा नंबर कोणाचा ? संगमनेर, ममदापूर, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, पुणतांबा, कोपरगांव, नेवासा, शेवगांव, पाथर्डी, राहुरी पारनेर आदी भागात गोमांस तस्करीचे गुन्हे घडलेले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button