दैनिक साईदर्शन ने मागच्या आठवड्यात आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केली होती त्यात भाकीत केले होते कि नंदुरबार एल सी बी ने मुख्य सूत्रधार भूपेंद्र पाटील ला अजमेर येथून अटक केली होती मग उर्वरित आरोपींना अहिल्यानगरचे एल सी बी वाले का अटक करत नाहीत हे भाकीत खरे ठरले ह्यामागे मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे एका दैनिकाच्या लेख मधून समोर आलेले आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ह्या एल सी बी ला डोक्यावर बसवले होते हे एल सी बी वाले पैश्यांसाठी नंगानाच करीत आहेत असे अनेक तक्रारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे गेल्या परंतु राकेश ओला यांनी यांना आर्थिक फायद्यासाठी पाठीशी घातले असतांना आहिल्यानगराचे खासदारं निलेश लंके यांनी ५ दिवस आमरण उपोषण करून एल सी बी चा लेखाजोखाच मांडला होता त्या ५ दिवसात शेकडो अर्ज ह्या एल सी बी च्या विरोधात प्राप्त झाले होते कुठून किती हफ्ता येतो हेही जाहीर केले होते त्यात प्रामुख्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची बदली व्हावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु राकेश ओला यांनी आर्थिक मोहापाई त्यांची बदली केली नाही याउलट दिनेश आहेर ला प्रोहत्सान दिले गेले होते राकेश ओला यांची बदली झाल्यानंतर नूतन आलेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची गयकरणार नाही दोषींवर कारवाई करतीलच अशी नागरिकांची अपेक्षा आहे काल एका दैनिकात प्रसिद्द झालेली बातमी पुढील प्रमाणे आहे राज्यातील विविध जिल्ह्यांत ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधाराकडून अहिल्यानगर पोलिसांच्या तत्कालीन एलसीचीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल दीड कोटीचे घबाड उकळल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंटच्या मुख्य सूत्रधाराला नुकतेच नंदुरबार पोलिसांकडून शिडीमध्ये दाखल गुन्ह्यात राहाता पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. कंपनीचा हा मुख्य सूत्रधार गेल्या अनेक वर्षांपासून ठेवीदारांची फसवणूक करत होता. हा प्रकार एलसीबीचे तत्कालीन एक पीएसआय व चार पोलीस कर्मचाऱ्यांना समजला. त्यांनी जानेवारी २०२५च्या पहिल्या आठवड्यात या मुख्य सूत्रधाराला उचलून आणले. संपूर्ण एक दिवस च मध्यरात्रीपर्यंत पैशासाठी त्याला टॉर्चर करण्यात आले. तेव्हा या सूत्रधाराने माझ्याकडे पैसे आहेत, परंतु कॅश नाही, बैंक अकाउंटमधून मी तुम्हाला देऊ शकतो, अशी विनवनी सुरू केली. तेव्हा एलसीबीच्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राहुरीतील एका मायक्रो फायनान्स कंपनीच्या चालकाशी संपर्क केला. त्याने खात्यावर रक्कम घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार एलसीबीचे कर्मचारी वा सूत्रचाराला बँकेत घेऊन गेले, त्याच्या खात्यावरील रक्कम मायक्रो फायनान्स कंपनीच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. रकम मिळाल्यावर या पोलीस कर्मचाऱ्यांनी सूत्रधाराला सोडून दिले. या घटनेनंतर पाच महिन्यांत दाम दुप्पट पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदारांचा संयम संपला आणि या घोटाळ्याच्या सूत्रधाराचा भांडाफोड झाला. नंदुरबारमध्ये या सूत्रधारावर गुन्हे दाखल झाल्यावर शिर्डी परिसरातील
ठेवीदारांनीही त्याच्यावर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर नंदुरबार, शिडीं, राहाता, औरामपूर येथील शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये या सूत्रधाराने हडप केले असल्याचे निष्पत्र झाले. जास्त पैसे मिळतील, या आशेने साई संस्थानचे कामगार, छोटे व्यापारी,
व्यावसायिक, नोकरदार यांनी ग्रो मोअरमध्ये पैसे लावले होते. तगादा करूनही ते मिळत नसल्याने गुंतवणूकदारांचा संयम संपला आणि कंपनीच्या मुख्य सूत्रधारावर गुन्हे दाखल झाले. आता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एलसीबीच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केलेला हा घबाड घोटाळा उघडकीस आला आहे. ज्यांनी कायदा पाळायचा, ज्यांनी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळायच्या त्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनीच आर्थिक लाभासाठी आरोपीकडून तब्बल दीड कोटीचे घबाड उकळले. ज्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या खात्यावर हे पैसे वर्ग करण्यात आले, त्या फायनान्स कंपनीच्या चालकाला १० लाख रुपये या कर्मचाऱ्यांनी दिले असल्याची माहितीही समोर आली आहे. तांत्रिक पुरावे हाती आल्यानंतर आज किंवा उद्या खाकीचा धर्म विसरत गुन्हेगाराकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या पोलीस अधिकारी व

कर्मचाऱ्यांवर येत्या दोन दिवसांत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आधीच अवैध धंद्याशी निगडीत अर्थकारण, गुन्हेगारांना साथ यामुळे एलसीबीचे पथक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे, त्यात या खंडणी वसुलीमुळे पोलीस दलाची प्रतिमा आणखी डागाळली आहे. एलसीबीच्या पथकाने पैसे उकळल्याची माहिती घोटाळयातील मुख्य सूत्रधाराशी निगडीत काही जणांनी ठेवीदारांना धमकावताना दिली होती. पोलिसांचे कंपनीच्या मालकाने आधीच मिटवले आहे. पोलिस आमचे काही करू शकत नाही, असे सूत्रधाराने स्थापन केलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपवरून त्याचे पंटर ठेवीदारांना धमकावत होते. नवे पोलीस अधीक्षक सोमनाथ चार्गे यांनी चार्ज घेतल्यावर ठेवीदारांनी एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी केलेला प्रताप त्यांच्या कानावर घातला होता. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती आहे जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांनी निपक्ष चौकशी करून दोषींवर बडतर्फ ची कारवाई करावी अशी मागणी होत आहे