
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत . अशी मागणी करणारे निवेदन डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.व या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री या नात्याने या प्रकरणाकडे विशेष स्वत: लक्ष घालावे. अशी मागणी करुन मुंबई येथे भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी विविध विषयावर नुकतीच चर्चा केली आहे.
मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी पुढे म्हणाले आहे की, शिर्डी हे देशातील तीर्थ क्षेत्रापैकी एक तीर्थस्थान आहे. लाखो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु हेच भाविक व शिर्डीतील सामान्य नागरीक सुरक्षित नाही. नुकतेच शिर्डीमध्ये साई संस्थानच्या दोन कामगारांची निर्गुण हत्या झाली व त्यातील एक कामगार गंभीर रित्या जखमी आहे.
तसेच शिर्डी परिसरात रस्त्याने जाणा-या शेतक-याला मारहाण झाली,मोटारसायकल चो-या व घरफोड्या हि तर नित्याची बाब झाली. शिर्डीत आलेल्या साईभक्तांच्या गाड्यांच्या काचा फोडुन त्यातुन सामान चोरीला जाते. साई भक्तांच्या गाड्या रात्रीच्या वेळी बंदुकीचा धाक दाखवुन राजरोसपणे लुटल्या जातात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिर्डीत येवुन मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचे कारण शिर्डीतील वाढती गुन्हेगारीआहे.
शिर्डीमध्ये वेगवेगळे अंमली पदार्थ तसेच व्यसनाधीनतेचे साहित्य पुरवून तरुणांची व्यसनाधीन पिढी बनविण्याचे व गुन्हेगार बनविण्याचे काम चालू असून त्यामुळे हे व्यसनाचे साहीत्य पुरविणारे व विकणारे यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या गुन्हेगारी मुळे सामान्य लोकांचे बळी जात आहे.
शिर्डीतील कामगारांचे खून ही घटना अत्यंत संतापजनक आहे. शिर्डीत गुन्हेगारांच्या टोळ्या वाढवल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शिर्डीत येणारे साईभक्तही सुरक्षित नाहीत. चैन स्नॅकींग ,पाकीटमारी या गोष्टीही थांबविणे गरजेचे आहे. सामान्य लोकांच्या मोटरसायकल चो-यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
माझ्या घरासमोरुन ३ दुचाकी चोरीस गेल्या. सीसीटीव्हि फुटेज मध्ये आरोपी स्पष्ट दिसत असतानाही अद्यापपर्यंत आरोपी पकडले गेले नाहीत. सर्व पुरावे असतानाही दुचाकी चोरणारे आरोपी पकडले जात नाहीत. हे अतिषय संताप जनक आहे. शिर्डीला दर्शनासाठी येणा-या साईभक्तांच्या गाड्या रात्री रस्त्यावर लुटल्या जातात. काही दिवसांपुर्वीच दोन ठिकाणी साई भक्तांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत .
याबाबत पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहे.शिर्डी व परिसरामध्ये मोटरसायकल चो-या, खुन,दरोडे, अपहरण, तसेच आंमली पदार्थ विक्री या सर्व प्रकारांवर आळा घालून गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे विविध विषयांवर चर्चा केली आहे.