Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरक्राईम

AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगमनेरच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी | दैनिक साईदर्शन
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाजासारखा मॉर्फ करून तयार करण्यात आलेला कथित बनावट ऑडिओ व व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गणेश मारुती डेंगळे (रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फिर्यादी अनिल नानासाहेब विखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाजासारखा भासणारा कथित मॉर्फ ऑडिओ आणि दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित केला. या सामग्रीमुळे समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून, मंत्री विखे पाटील यांच्या प्रतिमेला व चारित्र्याला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.


या प्रकरणाची गंभीर दखल घेत लोणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, बनावट ऑडिओ-व्हिडिओ नेमका कसा तयार करण्यात आला, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) किंवा अन्य तांत्रिक साधनांचा वापर झाला का, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.
सध्या सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बनावट आवाज, व्हिडिओ आणि छायाचित्रे तयार करून व्यक्तींची बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button