राहाता / शिर्डी : AAP उमेदवारांना नोटीस, राजकीय वातावरण तापलं
राहाता नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्या असून या कारवाईवरून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
“आम आदमीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कुणाच्या दबावाखाली केला जातोय?” असा थेट सवाल न्यायविधी तज्ञ रामनाथ सदाफळ यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी म्हटलं —
“समाजहितासाठी धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांना कितीही नोटिसा पाठवल्या तरी आमचा निर्धार विचलित होणार नाही. जनता स्वतःच आम आदमीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून योग्य उत्तर देईल.”
🚨 पोलिसांची नोटीस : निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन करा
पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, राहाता पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या नोटिशीचे मुख्य मुद्दे :
सध्या आदर्श आचारसंहिता लागू असल्याने सोशल मीडियावरील
आक्षेपार्ह पोस्ट
भडकावू विधान
खाजगी आयुष्यावर टीका
पूर्णपणे बंद
पूर्वी अशा घटनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याची नोंद
सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आक्षेपार्ह सामग्री, विवादित भाषणे, आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ टाळण्याचे निर्देश
📜 कायदेशीर इशारा : भंग केल्यास कारवाई निश्चित
PI नितीन चव्हाण यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये नोटीस देत स्पष्ट उल्लेख केला आहे की :
“आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाचा कायदा व सुव्यवस्था बिघडवणारा प्रकार घडल्यास भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई होईल.”
तसेच, नोटीस कोर्टात पुरावा म्हणून सादर केली जाणार असल्याची सूचना उमेदवारांना देण्यात आली आहे.
दिनांक : २६/११/२०२५ रोजी ही नोटीस अधिकृतपणे दिल्याची नोंद आहे.
