क्राईम
कारागृहात फेकले दोन दारुगोळे
अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काल रात्री उशिरा दोन दारुगोळे आढळले. यातील एका गोळ्याचा स्फोट झाला. त्यामुळे मोठा आवाज झाला. यामुळे कारागृह प्रशासन व कैद्यांची एकच तारांबळ उडाली. संपूर्ण कारागृहात दहशत पसरली.फ्रिजरपुरा परिसरात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुमारे १ हजार १०० पेक्षा अधिक कैदी आहेत. यातील काहींना जन्मठेप झाली आहे, तर काही जणांच्या विरोधात खटले सुरु आहेत. अशा कच्च्या कैद्यांची संख्या मोठी आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक येथीलही कैदीसुद्धा आणण्यात आले आहेत.
DN SPORTS