शिर्डी प्रतिनिधी
दि.07/09/2021 रोजी रात्री 10/00 वा. चे सुमारास आरोपी नामे अक्षय उर्फ बजरंग सुधाकर थोरात रा. जवळके ता. कोपरगांव व रोहीत बंडु खरात, रा. शिर्डी ता. राहाता यांनी अक्षय थोरात याचे शिर्डी येथील जोशी शाळे जवळील साई बजरंग जनरल ऍन्ड स्टेशनरी नावाच्या पत्र्याच्या गाळया मध्ये मयत नामे अजय कारभारी जगताप रा. तळेगाव ता. संगमनेर यास
तीन दिवसांपुर्वी झालेल्या वादाच्या कारणावरुन लोखंडी कोयत्याने अजय कारभारी जगताप याचे गळयावर वार करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले बाबत शिर्डी पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक / वैभव रुपवते तत्कालिन नेम. शिर्डी पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला गुरन 296/2021 भादवि कलम 302, 34 सह अर्म अॅक्ट 4/25 सह अनु. जाती जमाती (अट्रासिटी) कायदा कलम 3(2) 5 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली. तेव्हापासुन सदर गुन्ह्याची केस अॅडर ट्रायल चालु होती. सदर गुन्ह्यात तक्कालिन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्री. संजय सातव व तत्कालिन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सखोल तपास करुन सदर आरोपीतांविरुद्ध मा. राहाता कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.
आज दि.22/07/2025 रोजी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०२, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह अनु. जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, १९८९ चे कलम ३ (२) ५, अन्वये या अपराधासाठीच्या कॅलेंडरमधील प्रकरण क्रमांक विशेष खटला क्र. १२२ सन २०२४ मध्ये आरोपी
नामे अक्षय उर्फ बजरंग सुधाकर थोरात, रा. जवळके, ता. कोपरगाव, ह. मु. साई बजरंग जनरल स्टोअर्स, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांस मा. राजेश एस. गुप्ता, न्यायाधीश, विशेष न्यायालय, राहाता यांनी दोषी ठरवुन जन्मठेप व 10000/-रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचे प्रकरणात मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे सो।, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, श्री सोमनाथ वाकचौरे सो।. मा.अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, श्री. वैभव कलबुर्गे सो।. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्री शिरिष वमने सो।. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रणजीत गलांडे, कोर्ट अॅडली पोहेकाँ सुभाष माळी, मपोका बनकर, पोकाँ विशाल शिराळकर, सरकारी अभियोक्ता म्हणुन अॅडव्होकेट बी. डी पानगव्हाणे यांनी काम पाहीले आहे.