चंपाषष्ठी उत्सवानिमित्त शिर्डीतील खंडोबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

राजेंद्र बनकर – शिर्डी
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट अशा जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिर्डी येथील आओ साई खंडोबा मंदिरात वार्षिक चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरण संपन्न झाला आहे.उत्सवाच्या मुख्यदिनी शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविक तसेच देश विदेशातील हजारो साईभक्त आणि खंडोबा भक्तांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली. या उत्सवात वांगेसटी म्हणून प्रचीत असलेल्या मुख्य दिवशी भाविकांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत वांगी व भरीताचा महाप्रसादाचा लाभ घेतला. राञभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमात देवाचे जागरण आणि श्री खंडोबा महाराज अग्निकुंडातुन प्रवेश करण्याचा कार्यक्रम पार पडला आहे.प्रथेप्रमाणे मार्तंड म्हाळसापती महाराज यांचे पणतू दीपक मनोहर नागरे यांनी अग्निकुंडातून प्रवेश केला आणि त्यानंतर देशासह परदेशातील हजारो भाविकांनी या अग्निकुंडातुन प्रवेश केला आहे. साधारणतः १६० वर्षापूर्वीची परंपरा शिर्डीतील साईपरमभक्त नागरे परिवार ही खंडोबा मंदिर व येथील परंपरा जोपासत असुन यात चंपाषष्ठी उत्सव हा महत्त्वाचा उत्सव असुन यावर्षीही तो मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे यावेळी भाजपचे सचिन तांबे यांनी सांगितले.
तर श्री साईबाबा शिर्डीत आले तेव्हा प्रथम याच खंडोबा मंदिरात त्यांना आओ साई म्हणून संबोधले गेले ही भूमी साईबाबांच्या सहवासातली महत्त्वाची भूमी असुन सर्व साईभक्त प्रथम खंडोबा मंदिरात येऊन नतमस्तक होतात मग पुढील दर्शन याञा सुरु होते यामुळे अशा महत्त्वाच्या धार्मिक तीर्थस्थळी नागरे परिवार सर्व उत्सव सणवार मोठ्या उत्साहाने व नियोजनबद्ध पद्धतीने राबवत असुन साईभक्त खंडोबा भक्तांना या उत्सवाचा लाभ होत आहे.यामुळे खरं तर आपण नागरे परिवाराचा सत्कार करुन धन्यवाद मानले पाहिजे असे सुतोवाच यावेळी साईनिर्माण उद्योग समुहाचे विजय कोते यांनी सत्कार स्विकारतांना केले.
हा वार्षिक चंपाषष्ठी महोत्सव यशस्वी पार पडण्यासाठी आओ साई खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे , उपाध्यक्ष अजय नागरे , दीपक नागरे , निलेश नागरे , अशोक नागरे , श्रीकांत नागरे तसेच नागरे परिवार आणि खंडोबा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.