बांधावर शेजारच्याने टाकलेला टाकल्यामुळे एकाला जीव गमावावे लागले ह्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादीत म्हटले आहे कि मी नरेंद्र वाबळे साई संस्थान शिर्डी येथे सुमारे 12 वर्षापासुन कंत्राटी कर्मचारी म्हणुन नोकरीस आहे. आमचे शेत जमीनी शेजारी सचिन भाऊसाहेब माळवे यांची शेतजमीन असुन त्यांनी आमचे सामाईक बांधावर सिमेंटचे पोल उभे करुन
त्यावर तारेचे कुंपन केलेले असुन त्याचे क्षेत्रामध्ये बोर असल्याने त्यांने महावितरण कंपनीचे सिमेंट पोलवरुन आकडा टाकून त्याची वायर त्याने सामाईक बांधावर सिमेंटचे पोलवरील असलेल्या तारेवरुन बोर पर्यत नेलेली आहे.
दिंनाक 12/08/2025 रोजी सकाळी 10/00 वा चे सुमारास माझे वडील सुहास व आई अनिता है शेतात काम करण्यासाठी गेले होते. व मला शिर्डी येथे सकाळी 10/00 ते सांयकाळी 06/00 वा.अशी ड्युटी असल्याने मी डयुटीस गेलो होतो. त्यानंतर सायंकाळी 06/45 वाचे सुमारास मी घरी आलो.
त्यावेळी माझी आई अनिता ही शेतात काम करीत होती. त्यावेळी मी माझी आई अनिता हिस म्हणालो की, वडील कोठे गेले आहे. त्यावेळी माझी आई मला म्हणाली की, ते शेतातील सायपणचा कॉक बदलण्यासाठी दुपारी 04/00 वा. चे सुमारास गेले आहे असे सांगितल्याने मी तसेच माझी आई अनिता असे आम्ही दोघे जण आमचे घरी आलो.
वडील सुहास हे शेतातुन घरी न आल्याने रात्री 08/15 वाचे सुमारास मी आमचे मकातील पिकातील सायपण जवळ आलो. त्यावेळी माझे वडील सुहास हरीराम वाबळे हे शेतातील सायपणचे कॉकजवळ जमीनीवर पडलेले दिसले व त्यांचा डावा हात कंपाउंडचे तारेवरती होता. त्यानंतर माझे पाठीमागे आलेले माझे चुलते बाळाराम हरीराम वाबळे यांनी मला पाठीमागे ओढुन इलेक्ट्रीक पोलवरील टाकलेला आकडा बांबुचे साहाय्याने खाली ओढुन फेकला.
त्यानंतर मी आरडा ओरड केल्याने आमचे शेजारी राहणारे भाऊसाहेब कारभारी माळी गोरख कारभारी माळीस, धिरज बाळाराम वाबळे यांचे मदतीने खाजगी अॅम्बुलसने वडील सुहास हरीराम वाबळे यांना श्री. साईबाबा हॉस्पीटल शिर्डी येथे घेवुन गेलो. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन ते दिंनाक 12/08/2025 रोजी 20/42 वाचे पुर्वी मयत झाल्याचे घोषित केले.
त्यांचे प्रेतावर दिंनाक 13/08/2025 रोजी पोलीसांनी पंचनामा केल्यानंतर ग्रामीण रुग्णालय राहाता येथील डॉक्टरांनी पोस्टमार्टम केल्यानंतर प्रेत आमचे ताब्यात दिले. त्यांचे प्रेतावर आमचे धर्माप्रमाणे अंत्यविधी केला आहे.
तरी दिनांक 12/08/2025 रोजी दुपारी 04/00 ते रात्री 08/45 वा.चे दरम्यान सचिन भाऊसाहेब माळवे यांनी आमचे सामाईक बांधावर सिमेंटचे पोल उभे करुन त्यावर तारेचे कुंपन केलेले असुन त्याचे क्षेत्रामध्ये बोर असल्याने त्यांने महावितरण कंपनीचे सिमेंट पोलवरुन आकडा टाकुन त्याची वायर त्याने सामाईक बांधावर सिमेंटचे पोलवरील असलेल्या तारेवरुन बोर पर्यत हयगयीने व निष्काळजी पणाने
नेवुन सदर कुंपण तारेमध्ये विदयुत प्रवाह उतरल्याने त्याचा वडील सुहास हरीराम वाबळे वय 65 वर्षे रा. रांजणगाव रोड राहाता यांना इलेक्ट्रीक शॉक लागून ते त्यात मयत झाले आहे म्हणुन माझी सचिन भाऊसाहेब माळवे रा. रांजणगाव रोड राहाता ता. राहाता जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द कायदेशिर फिर्याद केली आहे