Letest News
अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का? लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक सूत्रधार जेरबंद-५ सोनोग्राफी मशीन-१९ आरोपी आणि ६ डॉक्टर गजाआड समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप
राजकीय

खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वाढदिवस उत्साहात

शिर्डी | प्रतिनिधी (साईदर्शन न्यूज)
शिर्डी विभागाचे कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. अमोल भारती साहेब यांचा आज वाढदिवस विविध स्तरातून शुभेच्छांच्या वर्षावात साजरा झाला आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवताना नागरिकांशी सुसंवाद, गुन्हेगारीवर कडक कारवाई आणि पोलीस प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा उभी करण्यात साहेबांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डीसारख्या संवेदनशील आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भागात सेवा बजावत असताना त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि तत्पर निर्णयक्षमता यांचा उत्तम समन्वय साधला आहे. गुन्हेगारांवर कडक तर सामान्य नागरिकांसाठी मदतीचा हात – हीच त्यांची ओळख बनली आहे.
सण-उत्सव, यात्रा, व्हीआयपी भेटी तसेच दैनंदिन पोलिसी कामकाजात त्यांनी आखलेले नियोजन नेहमीच कौतुकास्पद ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी अधिक जोमाने काम करत असल्याचे चित्र दिसून येते.


वाढदिवसानिमित्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी संघटना व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला असून, “अमोल भारती साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भविष्यात आणखी मोठी जबाबदारी पार पाडण्याची संधी लाभो” भारती साहेब याच जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून लाभों अशी भावना शिर्डीकरात व्यक्त केली जात आहे.
साईदर्शन न्यूज परिवाराकडूनही श्री. अमोल भारती साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐👮‍♂️

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button