कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भरतवाडी, वारी येथील अमोल मारुती बोर्डे या आरोपीची आपल्या पत्नीच्या खून प्रकरणातून सनसनाटी निर्दोष मुक्तता झाली आहे. २०१९ मधील या खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. मात्र न्यायालयाने पुरावे व साक्षी कमकुवत मानून आरोपीविरुद्धचा आरोप फेटाळून लावला.
🔸 चारित्र्याच्या संशयातून खून – गाव हादरवणारी घटना
फिर्यादी भानुदास मोरे यांच्या बहिणी सविता मोरे हिचा खून २१ जुलै २०१९ रोजी दुपारी १.३० ते २ वाजताच्या दरम्यान झाल्याचा आरोप होता.
चारित्र्यावर संशय – वाद – चिडचिड – आणि अखेर कुऱ्हाडीचा घाव…
अशी चर्चा त्यावेळी भरतवाडीत पसरली होती.
घटनेनंतर फक्त—
“ती पाणी भरताना पडून जखमी झाली”
अशी माहिती फिर्यादीकडे आली.
परंतु रुग्णालयात पोहोचताच मानेवरील खोल, भयंकर घाव पाहून संपूर्ण प्रकाराची पोलखोल झाली.
या आधारावर कोपरगाव पोलिस ठाण्यात 302 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल झाला.
🔸 १२ साक्षीदारांनी न्यायालयात हजेरी… पण पुरावेच पोकळ!
सरकार पक्षाने मोठी तयारी करून एकूण १२ साक्षीदार सादर केले. पण—
साक्षी विसंगत
पुरावे घटनास्थळाशी जुळत नाहीत
खून सिद्ध करणारी साखळी अपुरी
अशा त्रुटींमुळे संपूर्ण खटला डळमळला.
न्यायाधीश डी.डी. अलमले यांनी स्पष्ट म्हटलं—
“गुन्हा शंकातीत सिद्ध होत नाही.”
🔸 ॲड. अनुप ठोळे यांची आक्रमक बाजू – खटल्याला कलाटणी
आरोपीचे वकील ॲड. अनुप विजयकुमार ठोळे यांनी पुरावे व साक्षीतील त्रुटी अचूकपणे उघड करत न्यायालयात आरोपीची मजबूत बाजू मांडली.
त्यांच्या दमदार युक्तिवादामुळे अमोल बोर्डे याला निर्दोष मुक्तता मिळाली.