Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
राजकीयशिर्डी

शिर्डीचे भूमिपुत्र कमलाकर कोते यांनी योगगुरू बाबा रामदेव यांची घेतली सदिच्छा भेट

शिर्डीचे भूमिपुत्र तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी योगगुरू बाबा रामदेव यांची हरिद्वार येथे सदिच्छा भेट घेतली. शिर्डी येथून आठ दिवसांच्या योग शिबिरासाठी कमलाकर कोते, महेश महाले व त्यांचे सहकारी हरिद्वार येथील पतंजली योग भवनात गेले असून तेथे योग, प्राणायाम व आरोग्य विषयक विशेष प्रशिक्षण घेत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या भेटीदरम्यान योगगुरू बाबा रामदेव महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली कशी अंगीकारता येईल तसेच समाजामध्ये योगाचे महत्त्व कसे वाढवता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


यावेळी बोलताना योगगुरू बाबा रामदेव महाराज म्हणाले की, “योग ही भारताची हजारो वर्षांची अमूल्य परंपरा आहे. आज संपूर्ण जग योग स्वीकारत आहे. प्रत्येक नागरिकाने दररोज किमान एक तास योग व प्राणायाम केल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते. निरोगी शरीर आणि सकारात्मक विचारांसाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे.”


यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते म्हणाले की, “योगगुरू बाबा रामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधना करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. येथे येऊन योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीबाबत सखोल मार्गदर्शन मिळत आहे. शिर्डी परिसरात परतल्यानंतर युवक व नागरिकांसाठी योग शिबिरे आयोजित करून योगाबाबत जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे.”


या आठ दिवसांच्या योग शिबिरात सहभागी झालेल्या सर्व साधकांना विविध प्रकारचे योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन दिले जात असून निरोगी जीवनासाठी योगाचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button