Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरशिर्डी

धार्मिक स्थळं अशी असतात की, तिथं गेल्यावर आपोआपच नतमस्तक व्हावंसं वाटतं. साईबाबा हे असंच एक स्थान आहे ना. भुजबळ

(शिर्डी) : मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच शुक्रवारी शिर्डीत साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं. “नाशिकच्या पालकमंत्री विषयावर वाद-विवाद वाढवण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री होऊन जनतेची सेवाच करायची असते. पालकमंत्री नसलो तरी,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मी जनतेची सेवा करू शकतो. त्यामुळं मला पालकमंत्री पदाच्या वादात पडायची नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

नेहमीच साईबाबांच्या दर्शनासाठी येतो : मंत्री पद असो किंवा नसो, लहानपणापासूनच मी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतो. काही धार्मिक स्थळं अशी असतात की,

तिथं गेल्यावर आपोआपच नतमस्तक व्हावंसं वाटतं. साईबाबा हे असंच एक स्थान आहे. त्यामुळंच आज मी त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलोय. नवीन जबाबदारी पार पाडताना यश मिळावं आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी, साई चरणी प्रार्थना केली, असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button