
शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या आशिर्वादाने दरवर्षी होणाऱ्या शिर्डी परिक्रमेच्या तारखेची घोषणा केली जाते .यावर्षी आगळे वेगळ्या पद्धतीने मोठा कार्यक्रम करून या परिक्रमेची तारीख घोषित करून त्या दिवशी तीस हजार स्क्वेअर फुट शेतात गव्हाच्या माध्यमातून अवघ्या विश्वाला शिरडी परिक्रमेचे आमंत्रण देण्यात आले,

आणि लाखो साई भक्तांनी शिरडी परिक्रमा करून श्री साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केले. त्यानंतर शिरडीच्या मातीत पेरणी केलेल्या या गव्हाला अतिशय भक्ती भावाने पाणी देण्यात आले व पूर्ण काळजी घेऊन त्याची कापणी करून त्याचे नुकतेच गहू काढण्यात आले .
व सर्वांच्या श्रद्धेपोटी तेरा तुझको अर्पण या विचाराप्रमाणे शिर्डीच्या मातीत तयार झालेले हे गहू श्री साईंना अर्पण करून ते साईप्रसादालय येथे देण्यात आले. जेणेकरून हे गहू प्रसादालयात भोजनप्रसादाच्या माध्यमातून लाखो साई भक्तांपर्यंत पोहोचतील .
अशी भावना ठेवून ग्रीन इन क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्यावतीने आज दि. 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत साई मंदिर गेट नंबर 4 समोर सकाळी एका भव्य कार्यक्रमात या प्रसाद रुपी गहू साई संस्थांनला देणगी म्हणून देण्यात आले आहे.
त्याचा स्वीकार साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्वीकारून हे गहू भक्ती भावाने प्रसादालयात दिले आहेत. या कार्यक्रमाला ग्रीन इन क्लीन शिर्डी फाउंडेशनचे ग्रीन एन क्लीन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, डॉ.जितेंद्र शेळके कार्याध्यक्ष जेष्ठ न्यायविधीतज्ञ् अनिल शेजवळ,
रवींद्र गोंदकर गोपीनाथ गोंदकर ताराचंद कोते,मनीलाल पटेल, संजय शिर्डीकर,किशोर बोरावके, डॉ. दीपक जानी, विनोद गोंदकर संतोष महेर,सागर वाल्हेकर, नितीन शिंदे, नंदलाल मोटवानी, भारत चांदोरे,ऋषिकेश माळी, मदन गोंदकर आधी सदस्य उपस्थित होते सर्व पदाधिकारी, साईभक्त, संस्थांनचे अधिकारी, शिर्डी पोलीस स्टेशनचे पीआय श्री गलांडे साहेब ग्रामस्थ उपस्थित होते.