Letest News
दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक
क्राईमशिर्डी

कायद्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही खाकी पुढे कोणीही जेष्ठ नाही

शिर्डी प्रतिनिधी/ अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी यांना हॉटेलमध्ये येणाऱ्या जोडप्यांना कागदपत्राची खातरजमा केल्याशिवाय हॉटेल चालक व मालकांनी रुम  देऊ नये असे आव्हान जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे  अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे  व नव्याने पदभार घेतलेले पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी शिर्डीतील हॉटेल चालकांना यापूर्वीच केले असतानाही

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तसेच हॉटेलच्या बाबतीत कठोर कारवाई सुरू असतानाही राजाश्रयाच्या जोरावर आजून सुद्धा काही हॉटेल चालक आपल्या आर्थिक फायद्यासाठी  पोलिसांनी केलेल्या आव्हानाकडे  दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार शिर्डी शहरात नुकताच ४  सप्टेंबर २०२५  रोजी उघडकीस आला असून शिर्डी शहरातील हॉटेल बाबाज पॅलेस शिर्डी येथे घडला असून या हॉटेलचा मालक व कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीत दोन वेळा निवडणूक लढवलेला बाबा डमाळे असल्याचे देखील धक्कादायक  माहिती पुढे आली  आहे

अधिक माहिती अशी  की हॉटेलचाचालक मॅनेजर संतोष भाऊसाहेब गव्हाळे राहणार श्रीरामनगर शिर्डी याने अल्पवयीन मुलगी व तिच्या सोबत आलेल्या मुलास आर्थिक फायद्यासाठी कुठलीही खातरजमा न करता रूम उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर सोबत आलेल्या मुलाने अत्याचार झाल्याचा देखील प्रकार पुढे आला असून

सदरच्या हॉटेलवर पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या पोलीस पथकाने कारवाई करुन हॉटेल चालक संतोष भाऊसाहेब गव्हाळे याला अटक करून राहता न्यायालय पुढे हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून हॉटेल मालक बाबा डमाळे याचा शोध सुरू आहे

शिर्डी पोलीसांनी संतोष गव्हाळे राहणार शिर्डी,व  बाबा डमाळे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ८४८/२०२५ भारतीय न्याय संहिता ६५(१)सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४,८,१२,१७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या कारवाईत पोलीस कर्मचारी संतोष लांडे, गजानन गायकवाड, विजय धनगर, केवळ राजपूत ,महिला  पोलिस प्रियका गुंड ,यांनी भाग घेतला होता

शिर्डी शहरात शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांच्या हॉटेलवर शिर्डी पोलिसांनी कारवाई करून चालक व मालकावर गुन्हा दाखल केल्याने शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर खळबळ  उडाली आहे इतक्या मोठ्या नेत्यावर कारवाई करून जणू एकप्रकारचे बाकीच्या हॉटेल मालकांना व चालकांना पोलिसांनी संदेश दिला आहे कि अनाधिकृतपणे रूम भरणारे कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button