
भिंगार कँम्प पोस्टे दाखल गुरनं 505 / 2025 भारतीय न्याय संहीता 325,271 सह महा. पशु संरक्षण अधिनीयम 2015 चे कलम 5 क प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपीची माहिती काढत असतांना, पोनि किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ घटनेचे गांभिर्य ध्यानात घेवुन, पोहेकॉ/ दिपक घाटकर, पोहेकॉ/ सुनिल पवार, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोहेकॉ शाहीद शेख, पोहेकॉ फुरखान शेख, पोना भिमराज खर्से, पोकॉ सतिष भवर, पोकॉ योगेश कर्डीले, पोकॉ प्रशांत राठोड, मपोहेकॉ/ भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ छाया माळी, यांना तात्काळ नमुद गुन्हयातील आरोपीची माहिती घेवुन अटक करणेबाबत आदेशित करुन, वेगवेगळे पथके करुन रवाना केले. व्यावसायिक कौशल्याचा वापर करुन तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीती प्रमाणे गुन्ह्याचे ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी व त्या वरील दोन इसमांचा शोध घेतला असता. सदरची गाडी हि आरोपी नामे 1) तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर याच्या ताब्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्याचा शोध घेतला असता, तो मिळुन आला. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगीतले की, त्यांने दोन बैल गोवंश यांची राहते घरी कत्तल करुन, त्याचे मांस विक्री केले आहे. सदर कत्तर केले नंतर कत्तलीतील वेस्ट मासं व अवशेष हे फेकुन देणे करीता ओळखीचे दोन विधीसंघर्षीत बालक यांना मोपेड गाडी देवुन, त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले. सदर वेस्ट मांस व अवशेष हे त्यांनी कोठला बस स्थानक रोड कडेला फेकुन दिले. आरोपी 1) यांचेकडून नमुद गुन्हयात वापरलेली मोपेड गाडी ताब्यात घेण्यात आली असून, विना नंबरची जुनी वापरती मोपेट गाडी रु. 40,000/- किमंतीचा मुद्देमाल मिळुन आला.
ताब्यातील आरोपी 1) तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर आणि विना नंबरची जुनी वापरती मोपेट गाडी रु. 40,000/- किमंतीचा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन, गुन्हयाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.