
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हा अध्यक्ष श्री . सुधीर भद्रे यांनी केली आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून सलग धुवांधार पाऊस पडतो आहे .या पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे, फुल पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे . \
कांदयाची रोपे पूर्णतः वाया गेली आहेत,उडीद पिकाचे जागेवरच दाणे फुगून खराब झाले आहेत . सोयाबीन पूर्णतः पाण्यात असून सोयाबीनचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.त्यामुळे जास्त क्षेत्रावर पेरलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये खूपच घट येऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे . कापूस आणि तुरीचे पीक उबळायला लागलेले आहे .बहुतेक सर्वच शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठून अनेक पिके पाण्याखाली बुडालेली आहेत .
बहुतेक सर्वच नद्यांना आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसून पीकांचे व शेतीचे नुकसान झालेले आहे . त्याचप्रमाणे अतिरिक्त झालेल्या पावसाचे पाणी शेतात साचून शेतातच तळे निर्माण झाले आहे .
जास्त झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता .
मात्र पंचनामे करणाऱ्या कृषी आणि महसूलच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही नदी आणि ओढयांकाठी जाणे धोक्याचे झालेले आहे .तसेच दररोज पडत असलेल्या संततधार पावसामुळे फक्त नदीच्या आणि ओढ्या काठच्या पिकांचे पंचनामे करण्याऐवजी आता शासनाने पंचनामे न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनसंपदाच्या वतीने करण्यात आलेली आहे .
याचे कारण असे आहे की एक तर दहा ते पंधरा दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे . तसेच पंचनामे करताना काही ठराविक शेतकऱ्यांना पंचनामा करून घेण्याची हातोटी असल्यामुळे त्यांना अतिरिक्त मदत मिळते तर ज्यांचे पंचनामे होत नाही त्यांना काहीच मदत मिळत नाही .यामुळे शासन दुजाभाव करते तसेच शासकिय अधिकारी आणि गाव चालविणारी नेते मंडळी सुद्धा दुजाभाव करतात असा शेतकऱ्यांमध्ये समज होतो .
यामुळे शासनाची ही प्रतिमा मलिन होते .त्या ऐवजी अतिरिक्त झालेल्या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे केले आणि सर्वांना मदत दिली तर सर्व शेतकरी समाधानी होऊन सर्वांचीच दिवाळी गोड होईल असा आशावाद ,पोपटराव साठे,आर्किटेक्चर अर्षद शेख, सुनील टाकसाहेब, बाळासाहेब पालवे, राम धोत्रे, अशोक डाके, निवृत्तअभियंता संजय शिंदे, रवी सातपुते, वीरबहादूर प्रजापती , केशव बरकते, वहीद सय्यद, आकाश गायकवाड, बबलू खोसला, अशोक भोसले,राजेंद्र कर्डीले,विक्रम क्षीरसागर,फैरोज शेख,विजय शिरसाठ, नुरखां पठाण, कटारिया व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी व्यक्त केला आहे .